उत्तर प्रदेशात मुसळधार पावसामुळे सातजणांचा मृत्यू

    दिनांक :21-Jul-2021
|
सीतापूर, 
मुसळधार पाऊस आणि संंबंधित विविध घटनांमुळे सातजणांचा मृत्यू झाला असून, अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आज या संदर्भात माहिती देण्यात आली.

natre_1  H x W: 
 
जिल्हाधिकारी विशाल भारद्वाज यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज सकाळी सीतापूर जिल्ह्यातील लक्ष्मीपूर घराची भिंत आणि टिना पडल्याने एका कुटुंबातील चारजणांचा मृत्यू झाला. तसेच, अन्य दोघे गंभीर जखमी झाले. गावात नानकरी गावात घराची भिंत पडल्याने दाम्पत्य मृत्युमुखी पडले. याशिवाय मुसळधार पावसात छत अंगावर पडून साठवर्षीय इसमाचा मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबियांना प्रशासनाकडून प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विशाल भारद्वाज यांनी दिली. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांप्रति संवेदना व्यक्त केल्या असून, जखमींना योग्य उपचार देण्याचे आदेश दिले आहेत.