मॅक्राँ, इम्रान खान यांच्यासह इतर नेत्यांच्या फोनवरही पाळत?

    दिनांक :21-Jul-2021
|
- पेगासस प्रकरण
पॅरिस, 
जगभरात खळबळ उडवून देणार्‍या पेगासस पाळत प्रकरणात लक्ष्य झालेल्या मोठ्या नावांची यादी वाढत चालली आहे. पेगाससच्या यादीत जागतिक पातळीवरील नेत्यांच्या फोनवरही पाळत ठेवल्याचे समोर आले आहे. यामध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅनुएल मॅक्राँ आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरील रामफोसा यांच्यासह जागतिक नेत्यांच्या 14 नावांचा समावेश आहे. फुटलेल्या माहितीनुसार, 50 हजार फोन क्रमांकापैकी काही जणांचे फोन हॅकर्सच्या निशाण्यावर होते.
 
intre_1  H x W:
 
मोरक्कोचे राजे मोहम्मद सहावे, फ्रान्सचे राष्ट्रापती इमॅन्युएल मॅक्रॉन, इराकचे राष्ट्राध्यक्ष बरहम सालेह आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरील रामफोसा तर, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, इजिप्तचे पंतप्रधान मुस्तफा मदबौली आणि मोरक्कोचे सादएडिन एल ओथमानी यांच्या नावाचाही समावेश आहे. हे सर्वजण अद्यापही त्यांच्या संवैधानिक पदावर आहेत. एनएसओने मंगळवारी म्हटले की, पाळत ठेवण्यात आलेल्या किमान तीन नावांची ओळख पटवण्यात आली आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्राँ, मोरक्कोचे राजे मोहम्मद सहावे आणि जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक एनएसओच्या लक्ष्यावर नव्हते.
 
 
जगभरातील काही देशांमधील सरकारे पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यांवर पाळत ठेवली जात असल्याचा दावा करण्यात येत आहे. जगातील 17 माध्यमसंस्थांनी केलेल्या शोध पत्रकारितेत हा दावा करण्यात आला आहे. या हेरगिरीसाठी इस्रायली कंपनी एनएसओ ग्रुपच्या हॅकिंग सॉफ्टवेअर पेगाससचा वापर करण्यात आला.