नोवाक जोकोविच टोकियोत दाखल

    दिनांक :21-Jul-2021
|
टोकियो, 
ऑलिम्पिक या क्रीडा महाकुंभात भाग घेण्यासाठी प्रथम विश्वमानांकित टेनिसपटू सर्बियाचा नोवाक जोकोविच याचे बुधवारी दुपारी टोकियोतील हानेडा विमानतळावर आगमन झाले.
 
sport_1  H x W:
 
गत गुरुवारी 34 वर्षीय जोकोविचने आपले टोकियोसाठी आपले विमान तिकीट बुक केल्याची माहिती समाजमाध्यमातून दिली होती. ऑलिम्पिक टेनिस स्पर्धेत तो सर्बियाचे प्रतिनिधित्व करणार आहे. जर जोकोविचने पुरुष एकेरीचे सुवर्णपदक जिंकले, तर तो गोल्डन स्लॅम पूर्ण करणारा पहिला पुरुष टेनिसपटू ठरले. अर्थात एकाच कॅलेंडर वर्षांत चार ग्रॅण्ड स्लॅम व ऑलिम्पिक सुवर्णपदक पटकावणारा एकमेव खेळाडूचा विक्रम त्याच्या नावावर होईल.