प्रेम शुक्ला, शाजिया इल्मी भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते

    दिनांक :21-Jul-2021
|
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, 
प्रेम शुक्ला आणि शाजिया इल्मी यांची आज भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या आदेशाने या नियुक्त्या झाल्याचे भाजपाचे राष्ट्रीय महासचिव अरुणसिंह यांनी आज सांगितले.
 
natre_1  H x W:
 
खा. अनिल बलुनी मुख्य प्रवक्ता तसेच भाजपा माध्यम विभागाचे प्रमुख आहेत. या दोघांच्या नियुक्तीमुळे भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांची संख्या 27 झाली आहे. दिल्लीच्या असलेल्या शाजिया इल्मी मे 2014 मध्ये आपमधून भाजपात आल्या होत्या. तर मुंबईचे प्रेम शुक्ला 2015 मध्ये सामना तसेच शिवसेनेतील पदाचा राजीनामा देत भाजपात आले होते. राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून झालेल्या नियुक्तीबद्दल शाजिया इल्मी आणि प्रेम शुक्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह तसेच भाजपाचे अध्यक्ष नड्डा यांचे आभार मानले आहेत.