सारणी ठाण्यातील दोन पोलिस शिपायांना पदोन्नती

    दिनांक :21-Jul-2021
|
बैतुल(मध्य प्रदेश), 
जिल्हा पोलिस अधीक्षक सिमाला प्रसाद यांच्या आदेशावरून सारणी ठाण्यातील दोन पोलिस शिपायांना हेड कॉन्स्टेबलपदी बढती देण्यात आली आहे. सारणी ठाण्यातील पोलिस शिपाई एकानंद आणि अखिलेश धुर्वे यांना राज्य पोलिस दलाकडून पदोन्नती मिळाल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक फतेबहादूर सिंह यांनी दिली.
 
natre_1  H x W:
 
यानंतर दोन्ही कर्मचार्‍यांना पोलिस उपविभागीय अधिकारी महेंद्र सिंह चौहान, ग्रामभारती महिला मंडळाच्या अध्यक्ष भारती अग्रवाल यांच्या हस्ते दोन्ही कर्मचार्‍यांंना बॅच प्रदान केले. तसेच, शुभेच्छा दिल्या. एसडीओपी चौहान यांनी संबंधितांना लवकरच नवीन जबाबदारी मिळणार असल्याचे सांगत उज्ज्वल भविष्याबद्दल सदिच्छा व्यक्त केल्या. या प्रसंगी एकानंद आणि अखिलेश धुर्वे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच, पोलिस अधीक्षक सिमाला प्रसाद, एसडीओपी चौहान यांच्या मार्गदर्शनात काम करण्याची संधी मिळाल्याचे सांगितले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक फतेबहादूर सिंह, रवी ठाकूर, राकेश सरेआम, अलका राय, एएसआय मुज्जफर हुसेन, हेड कॉन्स्टेबल दिनेश झरबडे, शैलेंद्र सिंह, विकास, भूपेंद्र आदी उपस्थित होते.