रितेश पुन्हा एकदा मराठी चित्रपटात

    दिनांक :21-Jul-2021
|
मुंबई,
'लय भारी', 'माऊली' या मराठी चित्रपटांच्या यशानंतर बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख पुन्हा एकदा मराठी चित्रपटात झळकणार आहे. आगामी 'अदृश्य' या चित्रपटात तो महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. ताल, परदेस, कहो ना प्यार है, वेलकम बॅक आदी हिंदी चित्रपटांच्या सिनेमॅटोग्राफीची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे कबीर लाल यानिमित्ताने दिग्दर्शनात पदार्पण करणार आहेत. 
 

jo _1  H x W: 0 
 
'अदृश्य' हा थ्रिलर चित्रपट असून प्रमुख भूमिकेत पुष्कर जोग आणि मंजिरी फडणीस आहेत. लवली वर्ल्ड एंटरटेनमेंट या बॅनरखाली 'अदृश्य'ची निर्मिती अजय कुमार सिंह यांनी केली आहे. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल.