सखी वन स्टॉपने केली पीडितेची सुटका

    दिनांक :21-Jul-2021
|
- एम.टेक झालेल्याकडून सात वर्षांपासून होत होता छळ
 
 
वर्धा, 
गेल्या 7 वर्षापासून छळ सहन करणार्‍या पीडित विवाहीतेची महिलांसाठी समुपदेशनाचे पोलिसांच्या मदतीने काम करणार्‍या सखी वन स्टॉपच्या पदाधिकार्‍यांनी सुटका केली. मिळालेल्या माहितीनुसार सामान्य कुटूंबातील अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेल्या पीडितेचे स्थानिक सुदामपुरी येथील एम टेक झालेल्या मुलाशी 7 वर्षापुर्वी सदन कुटुंबातील मुलाशी लग्न झाले. मुलगा भुगाव येथील स्टिल कंपनीत इंजिनियर म्हणून काम करत असल्याने मुलगी सुखात राहिल असे तिच्या माहेरच्यांना वाटले. 
 
sakhii_1  H x W
 
 
परंतु, पती दारू ढोसून पत्नीला दररोज शिवीगाळ मारहाण करायचा. माहेरची परिस्थिती नाजूक असल्याने पीडिता माहेरी न न जाता पतीचा त्रास सहन करत राहिली. कधी तरी पती सुधारेल या आशेवर दिवस काढू लागली. गेल्या आठवड्यात पतीने कामावर न जाता दारू पिऊन छळ करत असल्याने पतीच्या त्रासाला कंटाळून आभासी पद्धतीने महिला मदत केंद्रात भ्रमणध्वनीवरुन मदत मागितली.
 
 
 
केरळ येथील मदत केंद्राने या प्रकरणाची सुचना वर्ध्यातील सखी वन स्टॉप केंद्राला दिली. माहितीची दखल घेत येथील दामिनी पथकाच्या पोलिस उपनिरीक्षक गावंडे यांना सुचना देत पोलिस पथकासह पीडित महिलेचा भ्रमणध्वनी ट्रेस करत महिलेला रेस्क्यू करण्यात आले. सखी वन स्टॉपच्या केंद्र प्रचारक रेश्मा रघाटाटे यांनी पीडित महिलेचे समुपदेशन करुन शहर पोलिसात तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले. सखी वन स्टॉपच्या स्वयंसेवकांनी पीडितेचे समुपदेशन करीत तिला तीच्या वडिलांकडे सुपुर्द करण्यात आले.