आभासी कार्यक्रमातही संस्कार भारतीचे अभंगांचा दुथडी आनंद

    दिनांक :21-Jul-2021
|
वर्धा, 
वर्ध्यातील संस्कार भारतीला मकरंद उमाळकर नावाचा एक हरफन मौला मिळाला आणि जे करायचे ते पुर्णत्वाला न्यायचे या जिद्दने ते सर्वांच्या मदतीने संस्कार भारतीतर्फे बसल्या जागी आषाढीची वारी घडवतात. कोरोनाच्या पृष्ठभुमीवर सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी असल्याने रंगीत तालीम घेऊन आषाढीच्या सायंकाळी विठूरायाच्या अभंगांचा आभासी दुथडी आनंद दिला. 
 
deep_1  H x W:
 
 
आषाढी एकादशीनिमित्त एक तासाचा सुरेल अभंगाच्या कार्यक्रमाचे लाईव्ह रेकॉर्डिंग करून तो दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर द्वारा विविध समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन लोकतंत्र सेनानी व ज्येष्ठ पत्रकार हरिभाऊ वझुरकर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी संस्कार भारतीचे विदर्भ प्रांत सह महामंत्री विवेक कवठेकर, महावीर पाटणी, घनश्याम सावलकर, संस्कार भारतीचे अध्यक्ष सतीश बावसे, उपाध्यक्ष माधव पंडित, डॉ. राममोहन बेंदूर उपस्थित होते.
 
 
 
हा कार्यक्रम स्वाध्याय मंदिर संचालक मंडळ द्वारा उपलब्ध करून देण्यात आलेल्या स्टेजवर रेकॉर्ड करण्यात आला. गायक कलाकार अनघा रानडे, केतकी कुळकर्णी, नितीन वाघ, अमित लांडगे व कवी नेसन यांनी अभंग सादर केली. नितीन वाघ यांनी सादर केलेले वेडा रे वेडा रे पंढरी... मोर्चे लावा भीमा तीरी हा अभंग भाव खाऊन गेला. समाजमाध्यमांवरही ररिकांनी या अभंगाला तेवढीच दाद दिली. तबल्यावर साथ संगत शाम सरोदे, मंगेश परसोडकर, संवादिनीवर नरेंद्र माहुलकर, व्हायोलिनवर सूरमणी वसंत जळीत, तर मंजीरा आणि टाळ वाद्यावर निलय परसोडकर होते. उच्च दर्जाचे निवेदन मंजिरी रासपायले यांनी केले. यशस्वीतेसाठी मकरंद उमाळकर, श्याम देशपांडे, पंकज घुसे, विलास कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.
 
 
 
परसोडकर बाप आणि लेक...
येथील संस्कार भारतीचे सदस्य मंगेश परसोडकर हे तबला वाजवण्यात निष्णात आहेत. संस्कार भारतीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात ते तबल्यावर असतात. यावेळी संस्कार भारतीच्या या अभंग गायणाच्या कार्यक्रमात तबल्यावर वडील मंगेश तर मंजीरा आणि टाळ वाद्यावर निलय परसोडकर हे बाप लेक दिसून आले.