जिल्ह्यात संततधार; लाल नाल्याचे 5 तर नांदचे 2 दारं उघडली

    दिनांक :21-Jul-2021
|
तभा वृत्तसेवा
वर्धा, 
जिल्ह्याच्या विविध भागात गेल्या 10 दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली असताना समुद्रपूर तालुक्यातील लाल नाला प्रकल्पाची पाणी पातळी वाढल्यामुळे प्रकल्पाची 5 दारवाजे 10 सेमी तर नांद धरणाचे 2 दरवाजे 5 सेमी 5 उघडण्यात आली आहे. नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 
 
laal_1  H x W:
 
 
मंगळवार 20 रोजी दुपारी कोरा येथील लाल नाला प्रकल्पाची पाच दरवाजे 10 सेंटिमीटर दारं उघडले असून त्यातून 25,70 क्यूसेक पाण्याचा विसर्ग चालू आहे. त्यामुळे नदीपात्र पाण्याने तुडुंब भरले आहे. लहान-मोठ्या नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हातील इतर प्रकल्पांच्या पाणीपातळीत अपेक्षित वाढ झाली नसताना लाल नाला प्रकल्पाची दारे मात्र उघडण्यात आली. आज सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र झड लागल्यासारखे वातावरण तयार झाले आहे.
 
 
 
आर्वी तळेगाव श्या.पंत रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे वर्धमनेरी परिसरात सुरू असलेल्या पुलाचे बांधकाम पुर्ण न झाल्याने पुलावरून पाणी वाहत असल्याने तळेगाव ते आर्वी हा मार्ग 4 तास बंद होता. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होते. तर याच मार्गाचे बांधकाम अर्धवट असल्याने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य तयार झाल्याने दररोज दुचाकी स्वारांची घसरगुंडी होत आहे.
 
 
 
जिल्ह्यात 53 टक्के उपयुक्त पाणीसाठा
जिल्ह्यात मोठी 11 जलाशयं आहेत. या अकराही जलाशयातील उपयुक्त पाणीसाठी 53.994 टक्के असल्याने येत्या काही दिवसात सलग पाऊस न आल्यास ऐन पावसाळ्यात पाणी टंचाई भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. बोर प्रकल्पात 50.595 टक्के, निम्न वर्धा 67.796 टक्के, धाम प्रकल्प 28.213 टक्के , पोथरा प्रकल्प 68.260 टक्के , पंचधारा 31.543 टक्के, डोंगरगाव 31.796 टक्के , मदन 41.951 टक्के , मदन उन्नई 0, लाल नाला 64.886 टक्के , वर्धा कार नदी प्रकल्प 20.078 टक्के तर सुकळी लघु प्रकल्पात शुन्य टक्के उपयुक्त पाणीसाठी आहे. मागील वर्षी उपयुक्त पाणीसाठी 328.6359 दलघमी होता.