तृतीयपंथी रेडिओ जॉकी अनन्याचा संशयास्पद मृत्यू

    दिनांक :21-Jul-2021
|
- मागील विधानसभा निवडणुकीतील उमेदवार
थिरुवनंतपुरम्, 
केरळ राज्यातील पहिली तृतीयपंथी रेडिओ जॉकी म्हणून ओळख मिळवलेल्या अनन्या कुमारी अ‍ॅलेक्स हिचा मृतदेह आढळला आहे. ही बाब संशयास्पद असल्याने तिच्या मित्रांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करत चौकशीची मागणी केली आहे.
 
natrf_1  H x W:
 
पोलिस सूत्रांनुसार, 28 वर्षीय अनन्याचा मंगळवारी सायंकाळच्या सुमारास शयनकक्षात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी आरोग्य अधिकार्‍यांना सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. कारण लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर आपली प्रकृती ठीक राहत नसून, आपण बराच वेळ एका ठिकाणी उभे राहू शकत नाही, काम करू शकत नाही. शस्त्रक्रियेतील काही चुकांमुळे आपल्याला आरोग्याशी संबंधित अडचणी जाणवत असल्याची माहिती तिने दिली होती. तर, आरोग्यासंबंधी तक्रारींमुळे मृत्यू झाल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.
 
 
दरम्यान, अनन्या ही विधानसभा निवडणूक लढवणारी पहिली तृतीयपंथी होती. मात्र, नंतर डीएसजेपी पक्षाकडून मानसिक त्रास दिला जात असून, हत्या करण्याची धमकी दिल्याचा आरोप करत उमेदवारी मागे घेतली होती. ती रेडिओ जॉकीसोबतच मेकअप आर्टिस्ट आणि खाजगी वृत्तवाहिनीत निवेदिका सुद्धा होती.