बुद्धिबळ पंच प्रमाणपत्र परिक्षेत अमित जैस्वाल व राहुल सावळे यांचे सुयश

    दिनांक :21-Jul-2021
|
- वाशीम जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर चमकले
वाशीम,
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने आयोजित केलेल्या अभासी राज्यस्तरीय बुद्धिबळ पंच प्रशिक्षण व प्रमाणपत्र पाठ्यक्रमासाठी दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या अंतर्गत घेण्यात आलेल्या परिक्षेत वाशीम जिल्ह्यातील अमित मदनलाल जैस्वाल आणि राहुल सोपानदेव सावळे यांनी उल्लेखनिय यश मिळविले आहे.
 
 
budhi_1  H x W:
 
या शिबिरात शिकविलेल्या अभ्यासक्रमावर आधारित ही पंच परिक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेस 168 प्रशिक्षणार्थी बसले होते. त्यापैकी 44 स्पर्धक अ श्रेणीत, 59 ब श्रेणीत, 54 क श्रेणीत तर 9 जण ड श्रेणीत उत्तीर्ण झाले. अमित जैस्वाल व राहुल सावळे हे अ श्रेणीत उत्तीर्ण झाले. अभा बुद्धिबळ महासंघातर्फे शाळेत बुद्धिबळ हा उपक्रम राष्ट्रीय स्तरावर राबविण्यासाठी वाशीम मधून राहुल सावळे यांची निवड झाली होती. कोरोना काळातील अभासी स्पर्धेत महाराष्ट्र राज्य निवड चाचणी स्पर्धेत अमित जैस्वाल आणि राहुल सावळे यांनी पंच म्हणून मोलाची कामगिरी पार पाडली. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष सिध्दार्थ मयूर, सचिव निरंजन गोडबोले, ग्रॅण्डमास्टर अभिजीत कुटे यांनी अभिनंदन केले.