2024 ची लोकसभा निवडणूक सोनिया गांधींच्या नेतृत्वातच

    दिनांक :21-Jul-2021
|
- काँगे्रसचा निर्णय
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, 
2024 च्या लोकसभा निवडणुकीपयर्र्त अध्यक्षपदावर कायम राहण्याची तयारी सोनिया गांधी यांनी केली आहे. याचाच अर्थ 2024 ची लोकसभा निवडणूक काँग्रेस त्यांच्या नेतृत्वात लढेल. राहुल गांधींकडे काँग्रेसचे अध्यक्षपद सोपवले जाण्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती, तिला आता पूर्णविराम मिळणार आहे. नजीकच्या काळात राहुल गांधींकडे काँग्रेसचे अध्यक्षपद जाण्याची शक्यता नाही.
 
natr_1  H x W:
 
राहुल गांधींकडे अध्यक्षपद सोपविण्याला होत असलेला पक्षांतर्गंत विरोध तसेच त्यांची निर्माण झालेली प्रतिमा यामुळे 2024 पर्यंत अध्यक्षपद आपल्याकडे कायम ठेवण्याची तयारी सोनिया गांधी यांनी केली आहे. राहुल गांधींकडे अध्यक्ष वा अन्य कोणतेही पद सोपविले जाणार नसले तरी पक्षाच्या घडामोडीतील त्यांचा हस्तक्षेप कायम राहणार आहे.
 
चार कार्यकारी अध्यक्षांची होणार नियुक्ती
काँग्रेसमध्ये मोठेबदल होण्याची शक्यता बळावली आहे, यात अनेक तरुण चेहर्‍यांना तसेच गांधी घराण्यावर निष्ठा ठेवणार्‍यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी यांच्या मदतीसाठी चार कार्यकारी अध्यक्षही नियुक्त केले जाण्याची शक्यता आहे. कार्यकारी अध्यक्ष म्हणून गुलाम नबी आझाद, सचिन पायलट, मुकुल वासनिक, शैलजा आणि रमेश चैन्नीथला यांच्या नावांची चर्चा आहे. प्रियांका वढेरा यांच्याकडे नव्या रचनेत कोणतीही जबाबदारी येईल, हे स्पष्ट झाले नाही. सध्या वढेरा काँग्रेस महासचिव तसेच उत्तरप्रदेशच्या प्रभारी म्हणून काम पाहात आहे.