जलयुक्त शिवारची एसीबी चौकशी होणार

    दिनांक :21-Jul-2021
|
- समितीने केली शिफारस
तभा वृत्तसेवा
मुंबई, 
देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळातील महत्त्वाकांक्षी अशा जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची लाचलुचपत प्रतिपंधक विभागाकडून (एसीबी) चौकशी होण्याची शक्यता आहे. या योजनेची चौकशी करणार्‍या विजयकुमार समितीने एसीबी चौकशी करण्याची शिफारस केल्याचे समजते. मात्र, यासंदर्भात अद्याप कोणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
 
maha_1  H x W:
 
फडणवीस सरकारच्या काळातील जलयुक्तशिवारच्या कामांची खुली चौकशी करावी, असे या समितीच्या अहवालात म्हटले आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या कामांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल झाल्या होत्या. कॅगनेदेखील ठपका ठेवला होता. यानंतर सनदी अधिकारी विजयकुमार यांच्या अध्यक्षतेत एक समिती याची चौकशी करीत होती. या समितीने राज्य सरकारला अहवाल सादर केला असल्याचे कळते. या योजनेतील एक हजार कामांची चौकशी करण्याचे आदेश होते. त्यातील 900 कामांची चौकशी एसीबीकडून तर उर्वरित 100 कामांची विभागीय चौकशी होणार असल्याचे बोलले जाते.
 
 
राज्याच्या अनेक भागांमध्ये पाण्याची भीषण टंचाई पाहता फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजना प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर अर्थात् 26 जानेवारी 2015 मध्ये राज्यात सुरू केली. राज्यातील पाणीटंचाईचा प्रश्न मिटविण्याचा यामागील उद्देश होता. जलयुक्त शिवार मोहिमेंतर्गत 22,586 गावांमध्ये 6.41 लाख कामे सुरू करण्यात आली. यापैकी 98 टक्के म्हणजेच 6.3 लाख कामं पूर्ण करण्यात आली आणि त्यावरी 9,633.75 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
...