नाव बदलून 'टिकटॉक' भारतात परतण्याची शक्यता

    दिनांक :21-Jul-2021
|
नवी दिल्ली, 
चिनी व्हिडीओ शेअरिंग अ‍ॅप टिकटॉक लवकरच पुन्हा एकदा भारतात परतण्याची शक्यता आहे. पबजीप्रमाणे नवे नाव आणि नवीन स्वरूपासह टिकटॉक आणले जाऊ शकते. टिकटॉकची मालकी असलेली कंपनी बाईट डान्सने आपल्या शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅपच्या नव्या ट्रेडमार्कसाठी कंट्रोलर जनरल ऑफ पेटेंटस, डिझाईन अ‍ॅण्ड ट्रेड मार्कमध्ये अर्ज सादर केल्याची माहिती समोर आली आहे.
मागील वर्षी जूनमध्ये केंद्र सरकारने 56 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. यामध्ये टिकटॉकचाही समावेश होता. सरकारने बंदी घातल्यानंतर टिकटॉक सर्वच अ‍ॅप स्टोअरवरून हटवण्यात आलं होतं.
 
natr_1  H x W:
 
टिप्स्टर मुकुल शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, टिकटॉकची मालकी असलेली कंपनी बाईट डान्सने 6 जुलै रोजी दाखल केलेल्या अर्जात नव्या ट्रेडमार्कमध्ये टिकटॉकचे स्पेलिंग बदलण्यात आले आहे. बाईट डान्स हे अ‍ॅप भारतात पुन्हा आणण्यासाठी केंद्र सरकारसोबत चर्चा करीत आहे. कंपनीने केंद्र सरकारला विश्वास दिला आहे की, ते नव्याने लागू करण्यात आलेल्या सर्व माहिती तंत्रज्ञान नियमांचे पालन करतील.