सेवेतील पारदर्शकता हीच विश्वमाऊली प्रतिष्ठानची खरी ओळख - ज्ञानेश्वर महाराज

    दिनांक :21-Jul-2021
|
- विश्वमाऊली प्रतिष्ठानचा पुरस्कार सोहळा
 
 
बुलडाणा, 
सामाजिक कार्य करतांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. आलोचना किंवा आरोप यातून पुढे निघून आपल्या लक्ष्यावर केंद्रीत होणे गरजेचे आहे.. परंतु संघर्षातून मिळालेले शाश्वत असते. विश्वमाऊली प्रतिष्ठानचा सेवाभाव शुद्ध आणि निर्मळ तर आहेच परंतु सेवेतील पारदर्शकता हीच त्यांची ओळख असल्यामुळे त्यांना समाजाचे पाठबळ नक्कीच मिळेल’, असा विश्वास हभप ज्ञानेश्वर माऊली शेलूदकर यांनी व्यक्त केला. 
 
KRUTADNYATA_1  
 
 
म्हसला बु. येथे विश्वमाऊली जनसेवा बहु. संस्थेच्या वतीने आज कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात पत्रकार रणजीतसिंग राजपूत यांना युवा पत्रगौरव पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले. तर पत्रकार राजेंद्र काळे यांना ज्येष्ठ पत्रगौरव, मनोज दांडगे यांना सेवागौरव, संदीप शेळके यांना उद्योगरत्न तर शहीद गोपाल कांबळे यांच्या मातोश्री सुशिला कांबळे यांना वीरमाता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘पदाने माणसे मोठी होत नसतात तर संस्काराने माणसांना प्रतिष्ठा लाभते’, असा मौलिक संदेश माजी आ.विजयराज शिंदे यांनी आपल्या भाषणातून दिला तर हिरकणी अर्बनच्या प्रमुख अ‍ॅड.वृषाली बोंद्रे यांनीसुद्धा विश्वमाऊली प्रतिष्ठान आणि हभप सागर महाराज भोंडे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
 
 
 
आषाढीच्या शुभ मुहूर्तावर द्वादशीला आज 21 जुलै रोजी हा कृतज्ञता सोहळा विश्वमाऊली आश्रमवर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. मंचावर वरील गणमान्यांसह राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष निलेश देठे, भाजपचे माजी आ.विजयराज शिंदे, मंदार बाहेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिखली विधानसभा उपाध्यक्ष गणेश नरवाडे पाटील, देवीदास पाटील, फेपाळे, निलेश गुर्जर, योगेश राजपूत आदींची प्रमुख उपस्थिती होती.