रस्ता सुरक्षेचा बुद्धिमान उपाय ‘आय रस्ते’ प्रकल्प

    दिनांक :11-Sep-2021
|
- निवृत्ती राय यांची माहिती
नागपूर, 
तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीच्या माध्यमातून रस्ता सुरक्षिततेसाठी बुद्धिमान उपाय म्हणजेच ‘आय रस्ते’ प्रकल्प असल्याचे इंटेल इंडियाच्या भारत प्रमुख निवृत्ती राय यांनी पत्रकारांना सांगितले. नागपूर महापालिका, कौंसिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, महिंद्र अँड महिंद्र, आयएनएआय, इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इंटेल आदी संयुक्तपणे हा प्रकल्प राबविणार आहेत. त्याचे लोकार्पण आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते झाले. 
 
csir _1  H x W:
 
 
त्या म्हणाल्या की, नागपूर शहरातील रस्ते अपघातात 2025 पर्यंत 50 टक्केपर्यंत घट आणि 2030 पर्यंत ‘व्हिजन झिरो’च्या दिशेने भारतासाठी ब्लूप्रिंट तयार करण्याचे उद्दिष्ट साध्य करायचे आहे. या अंतर्गत एका नावीन्यपूर्ण आणि समग्र रस्ता सुरक्षा रचनेत वाहन सुरक्षा, गतिशीलता विश्लेषण आणि रस्ते संबंधी पायाभूत सुविधांची सुरक्षा या तीन महत्त्वपूर्ण क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तासारखे तंत्रज्ञान वाहने, रस्ते आणि चालक सुरक्षित आणि सक्षम करण्यात परिवर्तनकारी भूमिका बजावतील.
 
 
 
‘सीएसआयआर’चे महासंचालक शेखर मांडे म्हणाले, समाजातील दैनंदिन समस्यांना सामोरे जाण्यासाठी पूरक कौशल्य असलेल्या शैक्षणिक, उद्योग आणि सरकारमधील विविध क्षेत्रातील भागीदारांमधील बहु-संस्थात्मक सहकार्याचे हे एक अद्भुत उदाहरण आहे. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर रस्ता सुरक्षा अंकेक्षण कार्यक्रम सादर करण्यात सीएसआयआर - सीआरआरआय अग्रणी आहे. सुमारे 9 हजार किमीचे रस्ता सुरक्षा अंकेक्षण पूर्ण केल्याचा आनंद असून या प्रकल्पात आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन करणार आहोत. ते अपघातग्रस्त ठिकाणे ओळखण्यास मदत करतील आणि त्यांच्या वाहनांमध्ये अपघात टाळण्याची प्रणाली बसविण्यापूर्वी आणि नंतर चालकांच्या वर्तनाचे मूल्यांकन करतील. हा प्रकल्प भारतातील रस्ते सुरक्षेच्या समस्येवर प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमाने निश्चितच मैलाचा दगड ठरेल आणि विविध शहरांमध्येही त्याचे अनुकरण करता येईल.
 
 
 
‘आयआयआयटीएच’चे संचालक प्रो. पी. जे. नारायणन् म्हणाले की, संभाव्य आणि पूर्वानुमान केलेल्या शक्तीच्या सहकार्याने रस्ता सुरक्षिततेची पुन्हा कल्पना करणे या प्रकल्पाचा उद्देश आहे. ‘अ‍ॅडव्हान्स्ड ड्रायव्हिंग असिस्टन्स सिस्टीम्स’ रस्ता वापरकर्त्यांची सुरक्षा वाढवण्यासाठी एक सुविधाजनक मार्ग प्रशस्त करेल. ‘एडीएएस अलर्ट’ सोबतच चालकाचे मूल्यांकन आणि प्रशिक्षण हे चालकाची कामगिरी लक्षणीय सुधारू शकते. गतिशीलता विश्लेषण संपूर्ण रस्ता नेटवर्कच्या जोखमींवर ग्रे आणि ब्लॅक स्पॉट, उच्च धोका किंवा अपघातप्रवण क्षेत्रे निश्चित करण्यासाठी सतत निरीक्षण करेल. अशा प्रकारची प्रतिबंधात्मक देखभाल ब्लॅक स्पॉट टाळून चालकाचा जीव वाचवू शकतात.