नेहरू पार्क गणेश मूर्ती ठरली भाविकांचे आकर्षण

    दिनांक :13-Sep-2021
|

bait _1  H x W:
 
 
बैतुल, 
बैतुल शहरातील नेहरू पार्क चौकात स्थापन करण्यात आलेली गणेश मूर्ती भाविकांचे मोठे आकर्षण ठरली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात श्री गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली असून, कुण्या मंडळाने डॉक्टरच्या गणवेषात तर कुठे पोलिसाचे रूप साकारले आहे. अशातच बैतुलमधील नेहरू पार्क चौकात स्थापन केलेल्या भगवान गणेशाच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. दरम्यान, सध्या जिल्हाभरातील वातावरण भक्तिमय झाल्याचे दिसून येते.