मोबाईलसह 30 हजार लुटणारे पोलिसांच्या ताब्यात

    दिनांक :14-Sep-2021
|
तभा वृत्तसेवा
वणी, 
वणीत आलेल्या एका भंगार विक्रेत्याला 13 सप्टेंबरच्या रात्री एका पांढर्‍या रंगाच्या बुलेटवरील तिघांनी मोबाइलसह 30 हजार रुपयांनी लुटल्याची घटना वणी शहरात रात्री घडली. या प्रकरणी तक्रारकर्ता अनवसखां महबूबखां (वय 22, हिंगणघाट) यांनी वणी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून तीन संशयित आरोपीची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
  
arrest_1  H x W
 
 
अनवसखां यांचा भंगार विकत घेण्याचा व्यवसाय आहे. ते व त्यांचा मित्र शेख ताज मोहंमद हे दोघेही सोमवार, 13 सप्टेंबरला भंगार घेण्यासाठी वरोरा येथे आले होते. तेथे मुक्कामाची व्यवस्था नसल्याने ते येथील अशोका बाजार लॉजवर थांबले होते. रात्री 10 च्या सुमारास ते दोघे जेवणाकरिता बाहेर पडले.
 
 
 
यवतमाळ रस्त्यावरील सम्राट ढाब्याजवळ थांबून असताना तीन इसम पांढर्‍या रंगाची नंबर नसलेल्या बुलेटने त्यांचाजवळ आले. त्यातील एकाने अनवसखांचे दोन्ही हात पकडून ठेवले व दुसर्‍याने सोबत असलेल्या शेख ताज मोहंमद याला पकडून ठेवले. तिसर्‍याने खिशात हात टाकून रोख रक्कम 30 हजार रुपये काढून घेतले. शर्टच्या खिशात असलेला ओपो एफ 17 हा 21 हजारांचा स्मार्टफोन काढून घेऊन पसार झाले.
 
 
 
पोलीस अनवसखां यांना घेऊन आरोपींना शोधण्यासाठी निघाले असता नांदेपेरा रस्त्यावरील तिरुपती मंगल कार्यालयासमोर उभी असलेली पांढर्‍या रंगाची बुलेट त्यांनी ओळखली. पोलिसांनी शोध घेतला असता मंगल कार्यालयाच्या भिंतीलगत अंधारात तीनजण बसून दिसले.
 
 
 
जर्मन उर्फ शेख अमीर शेख मेहबूब (वय 27, एकतानगर, वणी), सोनू उर्फ अतीकखान अमीरखान पठाण (वय 29, सिंधी कॉलनी वणी) आणि निखिल मुरलीधर किटकुले (वय 30, जटाशंकर चौक वणी) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई वणी पोलिस ठाणेदार श्याम सोनटक्के व उपनिरीक्षक शिवाजी टिपुर्णे यांनी यशस्वी केलीे.