लोजपाच्या खासदारावर बलात्काराचा आरोप

न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल

    दिनांक :14-Sep-2021
|
नवी दिल्ली, 
लोकजनशक्ती पक्षाचे खासदार प्रिन्स राज यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीतील कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशानंतर बलात्काराचा हा गुन्हा नोंदवण्यात आला. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले. त्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. खासदार प्रिन्स राज हे चिराग पासवान यांचे चुलत भाऊ आहेत.
 
natr _1  H x W:
 
तीन महिन्यांपूर्वी पीडित महिलेने पोलिस ठाण्यात तक्रर केली होती. परंतु, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. यानंतर पीडितेने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यानंतर खासदार प्रिन्स राज यांच्याविरोधात बलात्काराच्या कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे. लोजपाचे संस्थापक आणि दिवंगत नेते रामविलास पासवान यांच्या पहिल्या जयंती दिनानिमित्त चिराग पासवान यांनी 12 सप्टेंबर रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यासाठी छापलेल्या पत्रिकांवर काका पशुपती पारस आणि चुलत भाऊ राजकुमार राज यांची नावेही छापली होती. पशुपती पारस आणि राजकुमार राज या दोघांनीही चिराग पासवान यांच्याकडे पाठ फिरवली आहे.