अनिल देशमुखांच्या याचिकेवर खंडपीठ करणार सुनावणी

    दिनांक :14-Sep-2021
|
मुंबई, 
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या याचिकेवर सुनावणी करण्याची तयारी मुंबई उच्च न्यायालयाने दर्शवली आहे. त्यांची याचिका एकलपीठाकडे आली होती. मात्र, याचिकेत जे मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत, त्यावर एकलपीठ सुनावणी करू शकत नाही, असे न्यायालयाच्या रजिस्ट्रीने नमूद केल्यानंतर खंडपीठ त्यावर सुनावणी करणार आहे.
 
maha _1  H x W:
 
अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने बजावलेल्या समन्सविरोधात देशमुख यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. रजिस्ट्रीने आपला अभिप्राय कळविल्यानंतर न्या. संदीप शिंदे यांच्या एकलपीठानेही याचिका खंडपीठाकडे वर्ग केली आहे. या याचिकेवर रजिस्ट्रीने घेतलेला आक्षेप आणि ईडीने उपस्थित केलेला प्रश्न योग्यच असल्याचे न्या. शिंदे यांनी स्पष्ट केले. यामुळे आता देशमुख यांना ईडीच्या समन्सविरोधात उच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल करावी लागणार आहे.