प्रकरण प्रलंबित असतानाही राणांची प्रशिक्षकपदी नियुक्ती

    दिनांक :14-Sep-2021
|
नवी दिल्ली,
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघावर आधीच नकारात्मक प्रभाव असलेले नेमबाजी प्रशिक्षक जसपाल राणा यांची या महिन्याच्या अखेरीस होणार्‍या कनिष्ठ गट विश्व नेमबाजी स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राष्ट्रीय रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे (एनआरएआय) अध्यक्ष रणिंदर सिंग यांनी केली आहे.
 
spoort _1  H x
 
ऑलिम्पिकपटू मनू भाकेरच्या नेतृत्वाखालील कनिष्ठ भारतीय संघात 36 पिस्टल नेमबाजांचा समावेश असून यात 18 मुले व 18 मुली आहेत. आगामी 27 सप्टेंबरपासून पेरूच्या लिमा येथे कनिष्ठ गट विश्व स्पर्धा होणार असून भारतीय नेमबाज आठ प्रकारच्या स्पर्धेत भाग घेणार आहे. टोकियो ऑलिम्पिकनंतर मनू भाकेर व जसपाल राणा यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. राणांमुळे ऑलिम्पिकमध्ये माझ्या कामगिरीवर परिणाम झाला, असा आरोप मनू भाकेरने केला होता. वास्तविक रौेनक पंडित व समरेश जंग हे टोकियोत पिस्टल प्रशिक्षक म्हणून गेले होते. अनेक घटनांमुळे मतभेद वाढले. मनू भाकेर व राणा यांच्यातील संवाद तुटला. 27 ऑगस्ट रोजी संघाची घोषणा केली, तेव्हा एनआरएआयने प्रशिक्षकांच्या नावाची घोषणा केली नव्हती. बुधवारपासून नवी दिल्लीत विश्वचषक पूर्वतयारी शिबिर सुरु होणार आहे.