‘क्वाड’च्या बैठकीची चीनने घेतली धास्ती

    दिनांक :14-Sep-2021
|
वॉशिंग्टन,
येथे 24 सप्टेंबर रोजी होणार्‍या क्वाड देशांच्या बैठकीमुळे चीनला पोटशूळ उठले असून, या बैठकीत आपल्याविरोधात काही चर्चा, मसलत तर होणार नाही ना, या विचाराने ड्रॅगनचे धाबे दणाणले आहे.
 
intrer_1  H x W
 
क्वाड हा भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या चार देशांचा समूह आहे. त्सुनामीच्या तडा‘यानंतर या चतुर्भुज समूहाची स्थापना झाली. एखाद्या आपत्तीच्या किंवा परस्पर हिताच्या विषयांवर काम करणारा हा समूह आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन प्रथमच या बैठकीचे यजमानपद भूषवणार आहेत. या बैठकीच्या वृत्ताने चीनचा जळफळाट होत आहे. याविषयी विचारले असता, चिनी विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्या झाओ लिजियान म्हणाल्या की, क्षेत्रीय सहयोगाच्या उद्देशाने हे संघटन उभे झाले आहे. त्यात तिसर्‍या पक्षाला लक्ष्य केले जाऊ नये. या समूहाने इतर कोणत्याही देशाच्या हिताला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करू नये. मुळात हा समूह कधी लोकप्रिय होईल, असे वाटत नाही आणि याचे काहीच भविष्य नाही.
 
 
चीन हा आशिया खंडातील केवळ आर्थिक विकासाचा आधारच नाही, तर शांततेचा रक्षकही आहे. चीनमुळे आशिया आणि जगभरातील विकास तसेच शांततेला चालनाच मिळाली आहे. क्वाड समूहातील देशांनी शीतयुद्धाची मानसिकता आणि विस्तारवादी राजकारण सोडले पाहिजे. त्यांनी आपल्या क्षेत्रातील लोकांचा विचार केला पाहिजे, असेही लिजियन म्हणाल्या.