मुद्रांक शुल्क भरण्याइतके तरी ‘व्हाईट मनी’ आहेत का?

चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका

    दिनांक :14-Sep-2021
|
पुणे, 
अब्रुनुकसानीचा दावा ठोकताना न्यायालयात मुद्रांक शुल्कही भरावे लागते. हे मुद्रांक शुल्क भरण्याइतके तरी व्हाईट पैसे आहेत का, की ते पैसेही लोकवर्गणी काढून देणार आहेत हे पहावे लागेल. कारण, मुद्रांक शुल्क भरण्यासाठी ‘ब्लॅक’ नव्हे तर ‘व्हाईट मनी’ लागतो, अशी खोचक टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केली.
 
maha _1  H x W:
 
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटी रुपयांच्या भ‘ष्टाचाराचा आरोप केल्यानंतर मुश्रीफ यांनी त्यांच्याविरुद्ध 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे सांगितले होते. या पृष्ठभूमीवर भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफ यांना वरीलप्रमाणे टोला लगावला.
 
 
माझे नाव घेतल्याशिवाय हसन मुश्रीफ यांना झोप लागत नाही. किरीट सोमय्या यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ही त्यांची कार्यपद्धती आहे. काहीही झाले तरी 100-200 कोटी रुपयांचा दावा करण्याची भाषा ते करतात. अलिकडच्या काळात इतके घोटाळे बाहेर येत आहेत. त्या तुलनेत 100 कोटींच्या अब्रुनुसानीचा दावा ही तशी छोटी रक्कम आहे. त्यांनी पाचशे-हजार कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा ठोकला पाहिजे, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी हाणला.
 
 
महाराष्ट्रात ‘हॅम’ नावाचा ऐतिहासिक प्रकल्प राबविला, ज्यामुळे पूर्ण झालेल्या रस्त्यांचे उद्घाटन करणे त्यांना शक्य होत आहे. हा एका अतिशय महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प मी राज्यात आणला. त्या प्रकल्पात घोटाळा आहे, असे मुश्रीफ यांचे म्हणणे आहे. मग 19 महिने तुम्ही काय करत होते, झोपा काढत होते का, कोरोना काळात काळा पैसा गोळा करण्यात व्यग‘ होता का, असे प्रश्नही पाटील यांनी विचारले आहेत.