कृती सेननची नवी गाडी

    दिनांक :14-Sep-2021
|
मुंबई,
अभिनेत्री कृती सेनन सध्या खूपच चर्चेत आहे. मागील महिन्यातच तिचा 'मीमी' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानंतर तिचे सर्वत्र कौतुकही होत आहे. या मिळालेल्या यशानंतर तर आता तिने एक नवी कोरी गाडी खरेदी केली आहे. कृतीने Mercedes Maybach GLS 600 ही नवी कोरी कार खेरदी केली आहे. नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. तर गाडीसमोर तिने सुंदर पोझही दिली आहे. ही महागडी गाडी खरेदी केल्यानंतर कृतीने रेकॉर्डही बनवला आहे. ही गाडी घेणारी ती पहिली बॉलिवूड अभिनेत्री ठरली आहे.

hi _1  H x W: 0 
या कारची किंमतही तितकीच महागडी आहे. ही गाडी तब्बल 2.43 कोटी रुपयांची आहे. कृतीकडे आधीही काही महागड्या गाड्या आहेत. तर आता या नव्या मर्सिडीझची भर पडली आहे. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास कृती सध्याची बॉलीवूडमधील सर्वात बिझी अभिनेत्री आहे. तिच्या हातात अनेक प्रोजेक्‍ट्‌स आहेत. काही चित्रपटांचे शूटिंग पूर्ण झाले आहे, तर काही प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. आदीपुरुष, गणपत या बिग बजेट चित्रपटांतही ती झळकणार आहे. तसेच 'भेडिया'मध्ये ती अभिनेता वरुण धवनसोबत दिसणार आहे.