मोदींच्या राजवटीत अल्पसंख्यांक शंभर टक्के सुरक्षित

आयोगाच्या नव्या अध्यक्षांचा दावा

    दिनांक :14-Sep-2021
|
नवी दिल्ली, 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीत अल्पसंख्यांक समुदाय शंभर टक्के सुरक्षित असून, विद्वेषाच्या घटना चुकीच्या सिद्ध झाल्या आहेत, असा दावा राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे नवे प्रमुख इक्बालसिंह लालपुरा यांनी केला आहे.
 

natr _1  H x W:
 
लालपुरा यांनी नुकतीच अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, भाजपाच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या कार्यकाळात अल्पसं‘यक समुदाय सुरक्षित नसल्याची टीका काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांकडून करण्यात आली. ज्या घटनांना अल्पसं‘यकांच्या विरोधातील असल्याचे भासवले गेले, तसे मुळात काहीच नाही. हे सर्व आरोप खोटे असल्याचे सिद्ध झाले आहे. आपण घटनांची आकडेवारी पाहिली, तर मोदी सरकारच्या कार्यकाळात जातीय किंवा धार्मिक कारणावरून दंगल, हत्याकांड, लूट अशा प्रकरणांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. पूर्वी भाजपाचे सरकार नव्हते, तेव्हा आपण अलिगडमध्ये दंगलीच्या घटना सतत ऐकत होतो. मी घटनात्मक पदावर आहे. त्यामुळे मी केवळ आकडेवारी आणि सत्य पडताळणीवरूनच बोलू शकतो. त्यानुसार, देशात मागील काही वर्षांत जातीय कारणावरून हिंसाचाराच्या घटना कमी झाल्याचे ठामपणे सांगता येईल.
 
 
ज्या काही घटना सांगण्यात आल्या, त्यातील तथ्ये चुकीची असल्याचे लक्षात आले आहे. मुळात आपण सर्व भारतीयच आहोत. आपण भारतीय म्हणून विचार करायला हवा. जाती, धर्माच्या कसोटीवर विचार न करता देश या पातळीवर विकासाची कामे व्हायला हवी. हीच भावना मागील काही वर्षांत लोकांमध्ये रुजल्यामुळे अल्पसं‘यक समुदायाला पूर्वी वाटणारी असुरक्षितता आता कमी झाली आहे, असेही लालपुरा म्हणाले.