ई-पीक पाहणीच्या अंमलबजावणीसाठी सक्ती नको

बच्चू कडू यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

    दिनांक :14-Sep-2021
|
मुंबई, 
ई-पीक पाहणीच्या अंमलबजावणीकरिता शेतकर्‍यांवर सक्ती करू नये, अशी मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रातून केली आहे. ‘ई पीक पाहणी केली नाही, तर नुकसान भरपाई मिळणार नाही, हा कुठला न्याय आहे. या संदर्भात मी स्वत: मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांना भेटणार आहे, असे बच्चू कडू एका खाजगी वृत्तवाहिनीला सांगितले.
 
maha _1  H x W:
 
राज्यात सद्य:स्थितीत राबविण्यात येत असलेल्या ई-पीक पाहणी कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरमध्ये शेतकरी बांधवांकडून आपली शेतजमीन आणि पिकांची माहिती भरून घेण्यात येत आहे. परंतु, राज्यातील शेतकर्‍यांची परिस्थिती बिकट असून, ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना, अँड्रॉईड फोन, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, पुरेशा ज्ञानाचा अभाव इत्यादी अनेक अडचणी असल्यामुळे शेतकरी बांधवांकडून माहिती भरून घेण्याची सक्ती न करता पूर्वीप्रमाणेच शासकीय यंत्रणांकडून हा कार्यक‘म राबविण्यात यावा, अशी मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मु‘यमंत्री ठाकरे यांना पत्रातून केली आहे.
 
 
15 ऑगस्टपासून राज्यभर प्रकल्प
शेतजमिनीच्या उतार्‍यांवर पिकांची नोंद करण्याची पद्धत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. या पीक नोंदणीच्या आधारे शेतकर्‍यांना पीककर्जही दिले जाते. मात्र, दोन तीन गावांमध्ये मिळून एकच तलाठी असल्याने पीक पाहणी अचूक नोंदविली जात नाही, असा शेतकर्‍यांचा कायम आक्षेप होता. आता महसूल विभागाने आपल्या पिकाची ‘रिअल टाईम’ नोंदणी करण्याची सुविधा थेट शेतकर्‍यांना उपलब्ध करून दिली आहे. महसूल विभागाने यासाठी स्वतंत्र अ‍ॅप्लिकेशनची निर्मिती केली असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.