यवतमाळात एक बाधित, दोन कोरोनामुक्त

    दिनांक :14-Sep-2021
|
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
गेल्या 24 तासांत जिल्ह्यात एक नवीन कोरोना रुग्ण आढळून आला असून दोन जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या जिल्ह्याची कोरोना रुग्णसंख्या जिल्ह्यात तीन व बाहेर जिल्ह्यात एक अशी एकूण चार आहे. 
 
corona _1  H x
 
 
जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या माहितीनुसार मंगळवार, 14 सप्टेंबरला एकूण 884 अहवाल प्राप्त झाले. यापैकी केवळ एक अहवाल बाधीत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण रुग्णसं‘या 72,867 आहे तर बरे झालेले एकूण सं‘या 71,076 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1787 मृत्यूची नोंद आहे.
 
 
 
जिल्ह्यात आतापर्यंत 7 लक्ष 33 हजार 110 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 60 हजार 168 कोरोनामुक्त आहेत. सध्या जिल्ह्याचा बाधित दर 9.94 असून दैनंदिन बधित दर 0.11, तर मृत्यूदर 2.45 आहे.