पेले अतिदक्षता विभागातून लवकरच बाहेर येणार

    दिनांक :14-Sep-2021
|
साओ पाऊलो,
ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांची शस्त्रकि‘येनंतर प्रकृती सुधारत असून पुढील एक-दोन दिवसांत त्यांना अतिदक्षता विभागातून बाहेर येतील व त्यांना सामान्य कक्षेत ठेवण्यात येईल, अशी माहिती त्यांची कन्या केली नास्सिमेंटो म्हणाली.
 
sport _1  H x W
 
साओ पाऊलोच्या अल्बर्टो आइन्स्टाईन रुग्णालयात डॉक्टरांनी या महिन्याच्या सुरुवातीला तीन वेळच्या विश्वचषक विजेत्या 80 वर्षीय पेले यांच्या आतड्यातील एक गाठ काढून टाकली होती. शस्त्रक्रिया झाल्यानंतर आता त्यांना बरे वाटत आहे व त्यांना वेदनाही होत नाहीत. ते आज प्रसन्न दिसत होते. त्यांना एक-दोन दिवसांत नियमित कक्षेत स्थानांतरित केले जाईल व नंतर घरी परत जातील, असे नास्सिमेंटोने इन्स्टाग्रामवर सांगितले. ते फार खंबीर व जिद्दी आहे. जगभरात त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना होत आहे. चाहत्यांकडून मिळत असलेल्या प्रेमीमुळे त्यांची प्रकृती उत्तम होत आहे व यात यश मिळेल, असेही ती म्हणाली.