खामलवाडी (तांडा) येथील पांदणरस्ता दुरुस्त करा

    दिनांक :14-Sep-2021
|
- गोरसेनेचा तहसीलदारांना आंदोलनाचा इशारा
तभा वृत्तसेवा
महागाव, 
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे असे सर्वजण गोडवे गातात. परंतु वास्तविक परिस्थिती ही वेगळीच आहे. कधी निसर्ग साथ देत नाही. तर कधी शेतमालाचे भाव गडगडतात परंतु विविध समस्यांच्या विळ‘यात असलेल्या महागाव तालुक्यातील खमलवाडी (तांडा) येथील शेत स. नं. 16/1 ते 33/1 पर्यंत पांदणरस्त्याचे काम पालकमंत्री योजनेंतर्गत मातीकाम झालेले होते. 90 टक्के शेतकर्‍यांना ये-जा करण्याचा पांदण रस्ता आहे. पावसाने पांदण रस्त्यात लोकवर्गणीतून बसवण्यात आलेले सिमेंट पाईप वाहून गेला आहे. 
 
gorsena _1  H x
 
 
त्यामुळे नादुरुस्त नाल्यातून शेतकर्‍यांना शेतात जाणे अशक्य झाले आहे. खामलवाडी तांडा येतील शेतकरी, शेतमजूर, गुरेढोरे नाला ओलांडून जाऊ शकत नसल्याने तीन दिवसापासून घरातच बसलेले आहे. तरी संबंधित विभागाने शेतकर्‍यांची दशा लक्षात घेऊन त्वरित नाल्याची दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा शेतकरी बांधव व गोर-सेनेच्या वतीने तीव‘ आंदोलन करण्यात येईल.
 
 
 
तसेच शेतकरी शेतमजूर, जनावरांची तेथून ये-जा करताना जीवित अथवा वित्तहानी झाल्यास स्थानिक शासन-प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा गोरसेनेचे तालुकाध्यक्ष राजेश जाधव यांनी दिला. त्यावेळी गोरसेनेचे तालुका उपाध्यक्ष विकी आडे, सचिव समाधान राठोड उपस्थित होते.