मालेगावातील श्रीफळातील श्री गणेश

    दिनांक :14-Sep-2021
|
- गणेशोत्सव विशेष
मालेगाव, 
मालेगावातील केळी रस्त्यावरील श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरात श्रीफळाच्या आकारात कोरलेली श्री गणेशमूर्ती स्थापन केलेली आहे.हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. अष्टविनायकांपैकी एक लेण्याद्री येथिल गिरिजात्मजाचे दर्शन घेतल्यानंतर श्री फळातील गणेश मूर्ती स्थापन करण्याचा विचार स्व. तुळजाराम गाभणे यांनी केला आहे. 
 
shreeganesh _1  
 
 
मालेगाव शहरातील धोंडू वैरागड यांनी दगडाला श्रीफळाचा आकार देऊन त्यामध्ये श्री गणेश मूर्ती कोरून तयार केली आहे. हा गणपती सोंडेचा आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या कलशाची उंची 31 फूट आहे. मंदिरात श्री विठ्ठल रुख्मिणी, श्री शंकर, श्री हनुमान, श्री निलनाग यांच्या मूर्ती आहेत . मंदिरासमोर आकर्षक सभामंडप बांधण्यात आला आहे.
 
 
 
मंदिरालगत श्री तुळजाभवानी, श्री संत गजानन महाराज व स्व तुळजाराम गाभणे यांचे मंदिर आहे . मंदिरालगत बाराही महिने पाणि असणारी विहीर आहे. जवळच मालेगाव लघु पाटबंधारे प्रकल्प आहे. मंदिरावर श्री गणेशचतुर्थीला व दर मंगळवारी येथे भाविक दर्शनासाठी येतात. तसेच गणेशोत्सवात येथे भाविक मोठ्यासंख्येने दर्शनासाठी येतात