श्री गणेशाचे वाहन... आमचे लाडके 'मूषकराज'

गजानना श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया

    दिनांक :14-Sep-2021
|
श्री गणेशाय नमः
घराघरात सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. या कोरोना काळातही 'विघ्नहर्ता'चे स्वागत सर्व भक्त त्याच उत्साहाने करत आहे. तसेही बाप्पाचे नाव घेतले तरी मनात उत्साह व नवचैतन्य जागृत होतो. त्याचप्रमाणे गणपतीला आवडणारा पदार्थ म्हणजेच 'मोदक' देखील तयार होण्यास सुरुवात होते. ज्या उत्साहाने भक्त गणपती बाप्पाच्या आगमनासाठी उत्सुक आहेत. त्याच प्रमाणे, बाप्पा देखील त्यांचे वाहन म्हणजेच 'मूषकराज' सोबती सर्वांच्या घरामध्ये विराजमान होण्यास उत्सुक आहेत. यामध्ये एक प्रश्न सर्वांच्या मनात येत असेल की हत्ती मुखी गणपती एका लहान उंदरावर का स्वार होत असेल तर त्यामागेही एक कथा आढळून येते.

ganesh_1  H x W
 
सर्वांना माहिती असेलच की, 'मूषकराज' हे गणपतीचे वाहन आहे. त्याबद्दल विविध प्रकारच्या कथा रूढ आहे. त्यापैकी एक कथा अशी की, क्रौच नावाचा एक गंधर्व इंद्र सभेत उपस्थित असतांना चुकून त्याचा पाय वामदेवाला लागला. रागावलेल्या वामदेवाने त्याला श्राप दिला की, तू मूषक होशील. हे शब्द उच्चारताच थेट क्रौच गंधर्व मूषक झाला. एकदा मूषक रुपी क्रौच गंधर्व पराशरमुनिच्या आश्रमात दाखल झाला. त्याने आश्रमात जेवढे काही खाण्यासारखे पदार्थ होते ते सर्व खाऊन टाकले आणि बाकी काही वस्तू कुरतडून टाकले. त्याचा हा साहस बघून पराशरमुनींनी त्याला या श्राप पासून मुक्त करण्याची गणपती समोर प्रार्थना केली. पराशरमुनीची प्रार्थना स्वीकार करून प्रत्यक्षात श्री गणेश तेथे प्रकट झाले आणि आपला सर्वसमर्थ पाश मूषकावर टाकला. श्रीगणेशाच्या पाश यामधून त्याची सुटका झाली नाही. मूषक गणपतीला शरण येताच, गणपती प्रसन्न झाले. त्याला वर मागण्यास सांगितले. मात्र, मूषकाला गर्व झाला होता. मूषक उलट गणपतीलाच म्हणाला की, मी तुझ्या पाशी वर मागणार नाही तुला काय हवं ते मला सांग. मूषकाचे हे बोलणे ऐकून गणेश मूषकाला म्हणाले की, मी तुझ्याकडे वर मागतो की, ' तू आज पासून माझा वाहन हो' हे ऐकून मूषकला स्वतःच्या गर्विष्ठपणाचा पश्चाताप झाला. असे आधी गर्वाने आंधळे होऊन नंतर पश्चाताप करण्याचा उपयोग झाला नाही. म्हणून श्रीगणेशाच्या देहाचे भार पाठीवर बाळगत त्याला सर्वत्र वावरावे लागले.

ganesh_1  H x W
म्हणून, अशाप्रकारे मूषक सवार श्री गणेशाचे, संपूर्ण राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येत आहे. सर्वत्र गणेशभक्तांच्या मनात मोठा उत्साह आहे. पुढचे सर्व दिवस हा उत्साह असाच कायम राहणार आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ च्या गजरात संपूर्ण वातावरण मंगलदायी झाले आहे.
 
- पुष्पराज बोकडे