सोमय्यांनी ईडीला सोपवले मुश्रीफांविरोधातील पुरावे

- 2700 पानांचे दस्तावेज

    दिनांक :14-Sep-2021
|
मुंबई, 
भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्याविरोधातील पुरावे आज मंगळवारी अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीच्या येथील कार्यालयात जमा केले आहेत. या पुराव्यांत 2700 पानी दस्तावेज आहेत.
 
natr _1  H x W:
 
किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे त्यांनी आज दुपारी ईडीच्या कार्यालयात सादर केले. ईडीच्या अधिकार्‍यांसोबत सविस्तर चर्चा झाली. त्यांना कागदोपत्री पुरावे दिले आहेत, अशी माहिती सोमय्या यांनी दिली. हसन मुश्रीफ सोमवारी बोलत होते. त्यांना मी आज सांगतो की, सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात घोटाळा केला. या कंपनीत शेतकरी नव्हे, तर हसन मुश्रीफ व त्यांचे कुटुंबीय समभागधारक आहेत. शेतकर्‍यांनी या साखर कारखान्यात गुंतवणूक केली, पण मुश्रीफ यांच्या कुटुंबातील सहा व्यक्तींचा सहभाग यात असल्याचा दावा सोमय्या यांनी केला.
 
 
अबिद हसन मुश्रीफ, नाविद हसन मुश्रीफ, साजिद हसन मुश्रीफ, नबिला अबिद मुश्रीफ, सबिना साजिद मुश्रीफ, साहेरा हसन मुश्रीफ यांच्या नावाने 13 कोटी 30 लाख 49 हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. हसन मुश्रीफ यांनी बेकायदेशीर सावकारी करीत 78 कोटी 91 लाख 51 हजार 830 रुपयांचे समभाग घेतले, असा आरोप सोमय्या यांनी केला.