क्लब विश्वचषक यजमानपदासाठी दक्षिण आफ्रिका उत्सुक

    दिनांक :14-Sep-2021
|
केपटाऊन ,
कोरोनाच्या कारणास्तव जपानने डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या फिफा क्लब विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदातून माघार घेतल्यानंतर दक्षिण आफ्रिका या स्पर्धेचे आयोजन करण्यास उत्सुक आहे. सात संघांच्या या फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद मिळावे म्हणून दक्षिण आफ्रिकन फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष डॅनी जॉर्डन हे या आठवड्यात फिफाचे सरचिटणीस फातमा समौरा यांची नायजेरियातील लागोस येथे भेट घेणार आहे. क्लब विश्वचषकात युरोपियन विजेचा चेल्सी आणि इतर पाच खंडातील विजेते व सर्वोत्तम क्लब भाग घेणार आहे. या स्पर्धेत यजमान देशाच्या लीग विजेत्या संघालासुद्धा स्थान मिळते. जपानमध्ये अलिकडेच उन्हाळी ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमुळे संसर्ग वाढण्याची भीती वाट असल्याने जपानने फिफा क्लब विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यास असमर्थता व्यक्त केली.

sport _1  H x W 
 
फिफाने मात्र अद्याप पर्यायी यजमान संघाबाबत कोणतीही टिपणी केली नाही. दरम्यान, सौदी अरेबियासुद्धा या स्पर्धेच्या यजमानपदासाठी उत्सुक असल्याचे समजते. फिफा क्लब विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनासाठी दक्षिण आफ्रिका फुटबॉल संघटना आपल्या सरकारकडून परवानगी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. संघटनेने क्रीडा मंत्र्यांसोबत बैठकसुद्धा घेतली होती, असे डॅनी जॉर्डन यांनी सांगितले.