कोरोनामुळे अनाथ दहा मुलांसाठी प्रत्येकी दहा हजार

    दिनांक :14-Sep-2021
|
- तुुम्ही एकटे नाही, आम्ही तुमच्या पाठीशी
- यवतमाळ पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कोरोनामुळे माता-पित्याचे छत्र हरविलेल्या दहा बालकांच्या नावे प्रत्येकी 10 हजार रुपयांची मुदत ठेव करून त्यांच्या नावाचे प्रमाणपत्र त्यांना सुपूर्द केले. पोलिस अधीक्षकांनी, ‘मुलांंनो तुम्ही एकटे नाही, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’, असा विश्वास देत चिमुकल्यांच्या जीवनात नवी उमेद निर्माण केली. 

vima _1  H x W: 
 
 
कोरोना काळात अनेक मुलांचे पालकत्व हिरावले. कोणाचे आई, कोणाचे वडील तर कुठे दोन्ही पालकांचा मृत्यू झाला. त्यामुळे अशा एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या मुलांची गंभीर समस्या निर्माण झाली. दोन्ही पालक गमावलेल्या मुलांची मोठी कौटुंबिक व आर्थिक हानी झाली असून त्यांच्या भवितव्यावर त्याचा परिणाम होऊ नये, त्यांच्या शिक्षणावर संकट येऊ नये, यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे.
 
 
 
या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी सोमवारी स्वत:च्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोनामुळे माता-पित्यांचे छत्र हरवलेल्या दहा मुलांच्या नावे प्रत्येकी दहा हजार रुपयांची मुदत ठेव करून त्यांच्या दु:खावर फुंकर घातली. त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी आश्वस्त करीत, आपल्या कार्यालयात बोलावून त्यांचा सन्मान केला.
 
 
 
यावेळी भरोसा पथकातील सहायक पोलिस निरीक्षक विजया पंधरे, महिला सेलमधील सहायक निरीक्षक शुभांगी आगसे, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी ज्योती कडू, बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजुरकर, चाइल्ड लाईनचे जुमळे प्रामु‘याने उपस्थित होते.