काळ्या कोटमुळे जीवन अधिक मौल्यवान ठरत नाही

सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांना कानपिचक्या

    दिनांक :14-Sep-2021
|
नवी दिल्ली, 
कोरोनामुळे दगावलेला प्रत्येक जीव सारखाच मौल्यवान ठरतो. काळा कोट घालणार्‍यांचे जीवन इतरांच्या तुलनेत अधिक मौल्यवान ठरत नाही, अशा शब्दांत सुनावत सर्वोच्च न्यायालयाने वकिलांची जनहित याचिका फेटाळून लावली.
 
nat _1  H x W:
 
60 वर्षांहून कमी वयाच्या ज्या वकिलांचा मृत्यू कोरोना किंवा अन्य कारणाने होत असेल, त्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची सानुग‘ह राशी देण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका अ‍ॅड. प्रदीप कुमार यादव यांनी दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. विक‘म नाथ आणि न्या. हिमा कोहली यांनी म्हटले की, अनेक लोक दगावतात. त्यात तुम्ही अपवाद ठरत नाही. कोरोनामुळे दगावलेल्यांच्या आप्तांना किती अनुदान राशी द्यायची, हे यापूर्वीच न्यायालयाने निश्चित केले आहे. तुम्ही काळा कोट घातला म्हणजे तुमचे जीवन इतरांच्या तुलनेत अधिक मौल्यवान ठरत नाही. जे सर्वांसाठी ठरले आहे, तेच तुम्हालाही लागू राहणार आहे.
 
 
याचिकाकर्त्यांनी न्यायालयाची आक‘मकता पाहून याचिका मागे घेण्याचीही तयारी दाखविली. मात्र, न्यायालयाने ती परवानगी नाकारत याचिका साफ फेटाळून लावली. तसेच ही याचिका जनहित वाटत नसून, केवळ प्रसिद्धीसाठी केलेला प्रयत्न वाटत आहे, असे दटावत न्यायालयाने संबंधित वकिलांना दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावला.