निर्देशांकात घसरण, निफ्टी मात्र वधारला

    दिनांक :14-Sep-2021
|
 
masha _1  H x W
 
मुंबई,
जागतिक भांडवली बाजारांमधील संमिश्र कलाच्या परिणामामुळे आज मंगळवारच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांकात घसरण झाली असली, तरी निफ्टी मात्र वधारला आहे. आजच्या सत्रात निर्देशांक 69.33 अंकांनी घसरून 58,247.09 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात् निफ्टी 24.70 अंकांनी वधारून 17,380 या स्तरावर बंद झाला. आजच्या सत्रात इंड्सइंड बँकेच्या समभागांना सर्वाधिक फायदा झाला. त्यापाठोपाठ एचसीएल टेक, बजाज ऑटो, टेक महिंद्रा, एल अ‍ॅण्ड टी आणि कोटक बँकेच्या समभागांना फायदा झाला. दुसरीकडे नेस्ले इंडिया, अल्ट्रा टेक सिमेंट, एचयूएल, टाटा स्टील आणि बजाज फिनसर्व्ह या कंपन्यांच्या समभागांत घसरण झाली.