संसद टीव्हीचे आज लोकार्पण

    दिनांक :15-Sep-2021
|
नवी दिल्ली,
उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेचे सभापती ओम बिर्ला हे संयुक्तपणे उद्या बुधवारी संसद टीव्हीचे लोकार्पण करतील, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने आज मंगळवारी दिली. योगायोगाने आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनालाच संसद टीव्हीचे लोकार्पण होत आहे, असे पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
 
nattr _1  H x W
 
लोकसभा आणि राज्यसभा टीव्हीचे विलीनीकरण करण्याचा निर्णय फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आला आणि संसद टीव्हीच्या मु‘य कार्यकारी अधिकार्‍याची नियुक्ती मार्चमध्ये करण्यात आली आहे. संसद टीव्हीचे कार्यक्रम चार श्रेणींमध्ये असतील. लोकशाही आणि संसदीय कामकाज, प्रशासन आणि योजनांची अंमलबजावणी, धोरणे, इतिहास आणि भारतीय संस्कृती तसेच समस्या, आवडी आणि समकालीन स्वरूपाच्या मुद्यांवरील कार्यक्रम संसद टीव्ही प्रसारित करेल, असे पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.