अभियंत्यांची बदलती भूमिका आणि अभियांत्रिकी शिक्षण

अभियंता दिनानिमित्त

    दिनांक :15-Sep-2021
|
दिनविशेष :
 
 - प्रा. दीपक कुलकर्णी
 
 
राष्ट्रीय अर्थव्यवस्था ही शेती उत्पादन व सेवा क्षेत्रातून मिळणार्‍या अर्थप्राप्तीशी निगडीत आहे. कुठलीही उत्पादन प्रकि‘या अथवा कामाबाबत अभियांत्रिकी क्षेत्राशिवाय विचार केला जाऊ शकतो का? निश्चितच उत्तर नाही असंच मिळेल. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेसंदर्भात अभियंत्यांची भूमिका याचा विचार केला तर असं लक्षात येईल की आर्थिक बाब ही अभियांत्रिकी पुरवठ्याशी जोडली गेली आहे. आधुनिक युगात अभियांत्रिकी क्षेत्र हे विविध अंगी तंत्रशास्त्राने भरलेले आहे. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेशी जर आपल्या अभियंत्यांचे योगदान तपासून बघायचे असेल तर आपल्याला प्रथमत: अभियंता एक समाज बदलवणारा घटक आणि त्याची राष्ट्रीय अर्थ प्रगतीतील भूमिका याचे प्रामु‘याने विश्लेषण करावे लागेल.
 
blogs_1  H x W:
 
अभियांत्रिकी म्हणजे नेमकं आहे तरी काय? वैज्ञानिक व गणितीय तत्त्वांची प्रत्यक्षात उपयोगिता जसे की डिजाईन ,उत्पादन, आर्थिक घटकांची परिणामकारक पद्धती, यंत्र व त्यांची प्रकि‘या म्हणजेच अभियांत्रिकी होय. काम हे एका अर्थाने व्यावसायिक घटक म्हणून आहे. राष्ट्राच्या उन्नती व प्रगतीमध्ये अभियंत्यांचे मोलाचे योगदान आहे. आपली शिक्षण व प्रशिक्षण प्रणाली ही भविष्यातील अभियंत्यांची निकड भासवून परिपक्व असायला हवी, जेणेकरून वाढत्या जबाबदार्‍या व अपेक्षित संधींचा पुरेपूर लाभ अभियंत्यांना भविष्यात घेता यावा. औद्योगिक क्रतीपासून तर आजच्या माहिती-तंत्रज्ञान युगापर्यंतचा प्रवास बघितला तर अभियंत्यांची भूमिका खरोखरच वाखाणण्यासारखी आहे. पुढे काय... याचा विचार करून आराखडा तयार करणे गरजेचे आहे. अर्थप्राप्ती व आर्थिक प्रगती ही निश्चितच तंत्रशास्त्रातील कल्पकता व नावीन्यता यावर अवलंबून असते, हे सर्वांना आता पटले असावे.
 
 
नामवंत व्यवस्थापन तज्ज्ञ पीटर ड्रकर यांच्या मते अर्थप्राप्तीचे मूळ हे ज्ञानवृद्धिंगतेवर अवलंबून आहे. माणसाच्या कामाच्या योगदानातूनच उत्पादकता व नावीन्यता निर्माण होते व वाढतेदेखील. नव्या व्यवसायाच्या संधी व नवीन उत्पादने तयार करायच्या असतील तर ज्ञानाचा विकास होणे ही काळाची गरज आहे. राष्ट्राची खरी शक्ती अथवा जमेची बाजू म्हणजेच मानवी भांडवल याला आपण ह्यूमन कॅपिटल असे म्हणू शकतो. त्यातूनही मूलतः अभियांत्रिकी मानव शक्ती विशेष महत्त्वाची. नवे तंत्रज्ञान, नवी प्रक्रिया, नवी उत्पादने ही अभियंत्यांनी निर्माण करायला हवी. आरोग्य, बांधकाम, उत्पादन, माहिती तंत्रज्ञान व व्यवस्थापन संगणक प्रणाली या व इतर अनेक क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी अभियंत्यांना कायम सुवर्णसंधी आहे. ज्ञानाचा प्रत्यक्षात उपयोग करून समाजाची प्रगती करणे, हे मुख्य ध्येय अभियंत्यांनी मनाशी बाळगले पाहिजे. आधुनिक जागतिक स्पर्धात्मक युगात केवळ गुणवत्ताप्राप्त तंत्रज्ञान व कौशल्य पणाला न लावता निर्णय शक्तीचा यथोचित उपयोग पैसा, वेळ, मानवी भांडवल कमी करण्याचा प्रयत्न अभियंत्याने करणे ही काळाची गरज आहे. खरी अभियंत्याची भूमिका गुणवत्ता काम करणे, अशी असायला हवी. याकरिता अभियंत्याला व्यापक स्वरूपात ज्ञानाच्या कक्षा रुंदावता येतील.
 
 
अभियांत्रिकी ही मुळातच एक संपूर्ण प्रणाली असल्यामुळे तंत्रशिक्षणसुद्धा तसेच परिपूर्ण असावे. उदाहरणार्थ- अभियंत्यांमध्ये सहकार्‍यांसोबत काम करण्याचे कौशल्य तसेच उत्तम संभाषण कौशल्य असावे. त्यांच्यामध्ये बदल चटकन जुळवून घेणे व कालानुरूप बदल घडवण्याची क्षमता असायला हवी. प्रणाली पद्धतीने कामाची मांडणी व रचना, बाह्य घटकांची जवळीकता व आर्थिक विचारसरणीदेखील अभियंत्यांच्या भूमिकेत समाविष्ट असायला हवी. विशिष्ट ध्येयपूर्तीसाठी ज्ञान व कौशल्य याची सांगड घालणे, हाच खरा अभियांत्रिकी तंत्रशास्त्राचा सार आहे.
 
 
अभियंत्यांमध्ये नेतृत्व शैली व विविध क्षेत्रांची जाळे पसरवून योग्य ती फलश्रुती मिळवणे अंगीभूत असावे लागते. सध्याच्या 21 व्या शतकातील अभियंत्यांच्या समोर विविध आव्हाने उभी ठाकली आहेत. जागतिक व्यावसायिक स्पर्धा, आधुनिक माहिती तंत्रज्ञान, बदलती कार्यप्रणाली या विविध क्षेत्रांतील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अभियंत्यांना परस्पर व्यक्तिसंबंध सुदृढ करणे आवश्यक आहे. तसेच आरोग्य सेवा, सुरक्षा व वातावरणाला पोषक गुणवत्ताप्राप्त उत्पादन करणे जाणून घ्यायला हवे. उत्पादनामध्ये अधिक गुणवत्ता वाढविण्यासाठी अभियंत्यांना प्रयत्नशील असावे लागेल. औद्योगिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक व आंतरराष्ट्रीय बदलती परिस्थिती समजावून घेऊन बौद्धिक कौशल्य पणाला लावणे ही अलीकडच्या काळातील अभियंत्यांची बदलती भूमिका ठरेल.
 
 
अभियांत्रिकी तंत्र शिक्षणात वेगवेगळ्या विषयानुसार पाठ्यक‘म न ठेवता आंतरशाखीय अभियांत्रिकी पाठ्यक‘म इंटर डिसिप्लिनरी अ‍ॅप्रोच ही काळाची गरज आहे. पाठ्यक‘मामध्ये विषयांची एकमेकांशी सांगड घालणे महत्त्वाचे आहे. तर्कशुद्ध व प्रायोगिक अध्ययन असावे. नव्या संकल्पना अभियंत्यांना मांडता याव्यात. कठीण प्रसंग व प्रक्रियांवर सोपी उत्तरे शोधता यावी. स्वतंत्रपणे तसेच इतरांसोबत चमूत काम करण्याची क्षमता असावी आणि विज्ञान तंत्रज्ञानाची सांगड घालून सामान्य नागरिकाला उपयोगी उत्पादन तयार करण्यासाठी अभियंत्यांना कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे आणि म्हणूनच या सर्वांचा सहभाग पाठ्यक‘मात करणे मोलाचे ठरते.
 
 
व्यापक स्वरूपात विषयांची मांडणी पाठ्यक‘मात असावी. व्यवसायात लागणारी कौशल्ये व प्रशिक्षण पाठ्यक‘मांद्वारे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळायला हवे. त्यांना व्यवसायाच्या विविध संधी उपलब्ध व्हायला हव्यात. माहिती तंत्रज्ञान व प्रणालीने तर जागतिक स्तरावर जणू काही क‘ांतीच घडवून आणली आहे. वेब दुनियामुळे तर ‘कर लो दुनिया मुठ्ठी मे’ फारच सोपे झाले आहे. अभियंता व वैज्ञानिकांना पूरक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे ही पहिली पायरी आहे. नवीनता व कल्पकता यावर अधिक भर देणे पाठ्यक‘मात महत्त्वाचे ठरते. तंत्रशिक्षणात तंत्रज्ञान व उद्योग यांची सांगड घालून नवनवे उत्पादन तयार करण्यासाठी पाठ्यक‘माची वेळोवेळी पुनर्रचना करायला हवी.
 
 
थोडक्यात काय तर राष्ट्रीय आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी अभियंत्यांना निश्चितच महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागेल. व्यावसायिकरीत्या सशक्त, परिपक्व उत्पादकता, सेवा क्षेत्रातील संधीचा लाभ यात अभियंत्यांनी योगदान देऊन राष्ट्राच्या प्रगतीसाठी निश्चित भर घालावी...
 
अभियंता दिनाच्या निमित्ताने सर्व अभियंत्यांनी एकत्रित यावे. एकत्रित येऊन आपण सारे काम करूया. एकत्रित आनंद घेऊ. या, तिमिरातून प्रकाशाकडे जाऊ या... आपली शक्ती एकवटू या... एकमेकांशी अधिकाधिक परस्पर संबंध वाढवू या... भारताला महासत्ता बनविण्यासाठी!