अमिताभ यांची विठ्ठल भक्ती

    दिनांक :13-Jan-2022
|
 bhakti  
 
मुंबई,
Amitabh महानायक अमिताभ बच्चन यांनी मंगळवारी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपुरातील श्री विठ्ठलाचा फोटो ट्विट करत दर्शन घेतले. पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मातेस सुंदर पोशाख परिधान करून दररोज पूजा तसेच काकड आरती केली जाते. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने पूजेचे फोटो समाजमाध्यमावर सामायिक केले जातात. मंदिर समितीच्यावतीने ट्विटरवर सामायिक केलेले फोटो अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवर पोस्ट करीत प्रार्थना केली आहे. अमिताभ बच्चन यांनी ट्विट केलेल्या फोटोला अनेकांनी पसंती दिली असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बच्चन यांनी ट्विट केलेल्या फोटोवर ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ अशी प्रतिकि‘या दिली आहे.