भारत-चीन सीमा वाद संपेना!

    दिनांक :13-Jan-2022
|
- चर्चेची 14 वी फेरीही ठरली निष्फळ
 
नवी दिल्ली, 
Indo-China : लडाखमधील नियंत्रण रेषेवरील संघर्ष मिटवण्यासाठी भारत आणि चीनमदरम्यान Indo-China सुरू असलेली लष्करी पातळीवरील उच्चस्तरीय चर्चेची चौदावी फेरीही निष्फळ ठरली. या बैठकीतून कोणताही सकारात्मक परिणाम झाला नसून, वाद मिटवण्यासाठी दोन्ही देशांनी स्वीकारलेल्या उपायांवर एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतला आहे. चर्चेचा वेग कायम ठेवण्यासाठी पुढील फेरी लवकरच होणे अपेक्षित आहे.
 
 
Indo-China border
 
Indo-China दोन्ही देशांकडून याप्रकरणी प्रसिद्धीपत्रक काढले जाण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात दोन्ही देशांमध्ये चर्चेची 13 वी फेरी पार पडली होती. 31 जुलै रोजी बाराव्या फेरीची चर्चा झाली होती. दोन्ही देशाच्या परराष्ट्र नेत्यांची एससीओ शिखर बैठकीच्या निमित्ताने दुशान्बे येथे 16 सप्टेंबर रोजी भेट झाली होती. त्यानंतर दोन्ही लष्करांनी गोग्रा भागात माघारीची प्रकि‘या पूर्ण केली होती. पूर्व लडाखमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी ही फेरी महत्त्वाची ठरली होती. मात्र, या चर्चेत चीनला माघाऱ घेण्यापासून प्रवृत्त करण्यास भारताला अपयश आले.
 
 
पेंगाँग सरोवरावरील पुलाचा चीनला फायदा?
Indo-China पेंगाँग सरोवराच्या उत्तर व दक्षिण किनार्‍यांना जोडणारा पूल बांधण्यासाठी चीनने जमवाजमव सुरू केल्याची उपग्रहांनी टिपलेली छायाचित्रे एका होतकरू छायाचित्रण अभ्यासकाने ट्विटरवर सामायिक केले. पेंगाँग सरोवराची रुंदी जेथे सर्वांत कमी आहे अशा ठिकाणी ही पूलबांधणी सुरू असल्याचा सामरिक विश्लेषकांचा होरा आहे. प्रस्तावित पूल प्रत्यक्ष ताबारेषेपासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर आहे. पुलामुळे सैनिक आणि सामग्री तत्परतेने हलवणे चीनला शक्य होईल. बूमरँगच्या आकाराच्या पेंगाँग सरोवराच्या एकतृतीयांश भागावर भारताचा ताबा आहे. पुलापासून 20 किलोमीटरवर फिंगर एट हा पुढे आलेला पर्वतीय भाग भारताच्या दृष्टीने प्रत्यक्ष ताबारेषा आहे.
 
 

युद्धसज्जतेच्या इराद्यातूनच रस्ते, पूलबांधणी?
गलवान संघर्षांच्याही आधीपासून भारत-चीन यांच्यातील प्रत्यक्ष ताबारेषा व आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर अनेक ठिकाणी चीनने मोठया प्रमाणावर रस्ते व पूलबांधणीचे काम हाती घेतले होते. गलवाननंतर या कामांना वेग आला हे मात्र खरे. विशेषत: पेंगाँग सरोवराच्या दक्षिण भागात सैन्याच्या आणि अवजड संरक्षण सामग‘ीच्या हालचाली झटपट करता याव्यात यासाठी ही बांधणी सुरू आहे. भविष्यात भारताने बेसावध गाठू नये हा उद्देश तर यामागे आहेच. सीमावर्ती भागांमध्ये आणि विशेषत: वादग्रस्त भूभागांमध्ये पायाभूत सुविधांची उभारणी करण्याबाबत दोन्ही देशांमध्ये कोणताही करार झालेला नाही. याचा फायदा चीन उचलत आहे. रस्ते आणि पूलबांधणीपर्यंत हे कार्य सीमित नाही. काही भागांमध्ये छोटी गावे वसवण्याची तयारीही सुरू असल्याची बाब वेळोवेळी माध्यमांद्वारे समोर आली आहे.