नितेश राणेंच्या जामिनावर निर्णय सोमवारी

    दिनांक :13-Jan-2022
|
- अटकेपासून दिलासा कायम
 
मुंबई, 
आमदार नितेश राणेंच्या Nitesh Rane अटकपूर्व जामीनावरील मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाली असून, न्यायालय यासंबंधी सोमवारी निर्णय सुनावणार आहे. हा निकाल येईपर्यंत नितेश राणेंना Nitesh Rane अटकेपासून दिलेला दिलासा कायम ठेवण्यात आला आहे. संतोष परब यांच्यावरील हल्लाप्रकरणी हा खटला सुरू आहे. पण, विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना म्याव-म्याव प्रकरण राज्य सरकारला झोंबल्याने आपल्यावर सूडबुद्धीने कारवाई करणयात येत असल्याचा दावा नितेश राणेंच्या वतीने करण्यात आला. त्यावर संतोष परब हल्ला प्रकरण हे त्या आधीचे असून, या दोन घटनांचा कोणताही संदर्भ लागत नसल्याचे राज्य सरकारच्या वतीने न्यायालयात स्पष्ट करण्यात आले आहे.
 
 
Nitesh Rane
 
आता या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून, त्यावर न्यायालय सोमवारी आपला निकाल देणार आहे. पण, तोपर्यंत आमदार नितेश राणेंना Nitesh Rane अटकेपासून दिलेला दिलासा कायम ठेवण्यात आला आहे. सतीश सावंत हल्ला प्रकरणात पोलिसांनी नितेश राणे यांच्यावर भादंविचे कलम 307 (हत्येचा प्रयत्न), कलम 120 (बी) (गुन्हेगारी कट रचणे), कलम 34 (समान उद्देश) अंतर्गत गुन्हा दाखल करून आठ जणांना अटक केली आहे. या प्रकरणात आपल्याही अटकेची शक्यता निर्माण झाल्याने नितेश राणे आणि संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.