यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द

    दिनांक :13-Jan-2022
|
पुणे,
Sawai Gandharva Bhimsen Festival : दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द करण्यात आला आहे. या निर्णयामुळे रसिकांची निराशा झाली आहे. 6 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
 
 
Sawai Gandharva Bhimsen Festival
 
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा 68 वा सवाई गंधर्व भीमसेन मोहत्सव Sawai Gandharva Bhimsen Festival रद्द करण्यात आला आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे सरकारने लावलेल्या निर्बंधांमुळे यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द करण्यात येत आहे, अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी दिली आहे. यंदाचे वर्ष पंडित भीमसेन जोशींचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यांनी सुरू केलेला हा महोत्सव यावर्षी धडाक्यात साजरा व्हावा, अशी रसिकांची इच्छा होती. पण, या महोत्सवाची भव्यता, व्याप्ती व आयोजनासाठी लागणारा कालावधी लक्षात घेण्यात आला तसेच सध्याची कोरोनाची स्थिती पाहता हा महोत्सव Sawai Gandharva Bhimsen Festival रद्द करण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याचे जोशी यांनी सांगितले.