धर्माची प्रमुख दहा लक्षणे!

aricle on Ten facts about Hindu Dharma

    दिनांक :14-Jan-2022
|
अथा तो जीवन जिज्ञासा  
 
- प्रा.प्र.श्री.डोरले
 
‘‘धर्म Hindu हा भारताचा प्राण आहे. धर्मासाठीच Hindu तो प्रत्यक्ष परमेश्वराने निर्माण केला आहे. त्याच कार्यासाठी तो जगणार आहे. संपूर्ण विश्वाला अध्यात्म विद्येचे Hindu ज्ञान देणे हेच त्याचे ‘मिशन' आहे. परमेश्वराने दिलेले हे कार्य त्याला करावेच लागणार आहे. दुसरा कोणताही मार्ग नाही. ‘नांन्य पंथः विद्यते अयनाय.' वुई ह्याव टेकन द क्रॉस ऑन आवर शोल्डर्स अँड वुई ह्याव टु बेअर इट अन् टु आवर डेथ... नो एस्क्युज माय डिअर चिल्ड्रेन!' डु ऑर डाय.'' इतक्या निर्वाणीच्या आणि खणखणीत भाषेत स्वामी विवेकानंदांनी धर्म Hindu आणि भारतीय समाजाचा म्हणजे, हिंदू Hindu जीवन पद्धतीचा जो अतूट आणि अपरिहार्य संबंध आहे; त्याचे विवेचन केले आहे. वेदकाळापासून हे सत्य दिव्यदृष्टिसंपन्न ऋषिमुनींच्या लक्षात आले आहे. म्हणूनच ‘धर्मं चर' Hindu ही पहिली आज्ञा उद्घोषित झाली. त्यानुसार मानवी जीवनाचा विकास व्हावा म्हणून ‘धर्म' Hindu हा प्रथम पुरुषार्थ प्रस्थापित केला गेला आणि त्या केंद्राभोवती उर्वरित तीन पुरुषार्थांची म्हणजे ‘अर्थ-काम-मोक्ष' यांची रचना झाली. त्याचा निहित अर्थ असा की, धर्माधिष्ठित जीवनाची फलश्रुती म्हणजे परमेश्वरप्राप्ती- मोक्ष !
 
 
edi
 
या वाटचालीतील जीवनाच्या सुखकारक, सुरक्षित वाटचालीसाठी उपयुक्त, नव्हे अत्यावश्यक असलेले अर्थ आणि काम हे दोन पुरुषार्थ म्हणजे मानवी जीवनाच्या व्यावहारिक, प्रापंचिक जीवनाशी संबंधित ‘धर्म Hindu आणि मोक्ष' हे ‘निःश्रेयसत्त्व' दर्शवितात तर ‘अर्थ आणि काम' हे दोन पुरुषार्थ ‘अभ्युदय' म्हणजे भौतिक समृद्धता, संपन्नता दर्शवितात. या प्रकारे संपूर्ण जगामध्ये हिंदू Hindu  जीवन पद्धती हीच एकमेव पद्धती अशी आहे की, ज्या पद्धतीत वेद-उपनिषद काळापासून प्रस्थापित ‘श्रेय आणि प्रेय' (कठोपनिषद) ‘अभ्युदय आणि निःश्रेयस' पुढील काळात प्रस्थापित झालेले प्रपंच आणि परमार्थ प्रवृत्तिमार्ग आणि निवृत्तिमार्ग यांची एकात्म, एकरस असा समतोल समन्वय आढळून येतो. ‘होमोजिनियस अँड इंटिग्रेटेड कॉम्बिनेशन ऑफ वर्डली लाईफ अँड स्पिरिच्युअल लाईफ' (योगी अरविंद) Yogi  Arvind 
 
 
धर्माचे Hindu स्वरूप आणि लक्षणे
वेदकाळापासून धर्म Hindu या विषयावर भारतात विविध दृष्टिकोनातून मूलभूत आणि सर्वस्पर्शी चिंतन झाले आहे. त्यातून धर्माचे स्वरूप, त्याची लक्षणे अधिकाधिक आणि सर्वव्यापी असणारी अशी स्पष्ट झाली आहेत. त्यातूनच हिंदू Hindu जीवन पद्धतीच्या धर्म या प्रमुख पुरुषार्थीची मजबूत आधारशिला प्रस्थापित झाली आहे. धर्माच्या विविध स्वरूपी मांडलेल्या लक्षणातून हे सहजपणे लक्षात येऊ शकते. यात्रवल्क्य हे स्मृतिकार आहेत. त्यांनी धर्माचे पाच मूलाधार वर्णन करताना म्हटले आहे की-
श्रुतिः स्मृतिः सदाचारः स्वस्य च प्रियमान्मनः।
सम्यक संकल्पजः कामो धर्ममूलमिदं स्मृतं।।
म्हणजे- वेद, स्मृती, सत्पुरुष सज्जनांचा व्यवहार, धर्मानुष्ठानात विकल्प उद्भवल्यास स्वतःला प्रिय वाटणारे पण शास्त्रविरुद्ध नसणारी आणि उत्तम संकल्पातून निर्माण होणारी इच्छा हे धर्माचे पाच मूलाधार आहेत. महर्षी व्यासांनी धर्माचे लक्षण सांगताना महाभारतात असे म्हटले आहे की, जो सर्व मनुष्यमात्रांचे, सृष्टीचे धारण करतो, त्याला धर्म Hindu असे म्हणतात. केवळ मनुष्याचेच नाही तर संपूर्ण राज्याचेही धारण धर्मच करीत असतो.
नमो धर्माय महते धर्मो धारयति प्रजाः।
यत् स्याद धारणायुक्तं स धर्म इत्युदाहृत:।।
त्रिवर्गोऽयं धर्ममूलं नरेन्द्र राज्यं वेदं धर्ममूलं वदन्ति।
याचा अर्थ हा स्पष्ट आहे की, उर्वरित अर्थ, काम, मोक्ष हे या मूळ धर्मावरच Hindu अधिष्ठित आहेत. इतकेच नव्हे, तर राज्यसुद्धा या धर्मशक्तीवरच Hindu टिकत असते. अवलंबून असते.
 
कणाद मुनींनी धर्माची व्याख्या व लक्षणे सांगताना असे म्हटले आहे की, जो ऐहिक, लौकिक समृद्धता आणि त्याचबरोबर पारलौकिक सुख ही प्राप्त करून देतो, त्याला धर्म असे म्हणतात. ‘यतोऽभ्युदयः निःश्रेयस सिद्धि स धर्म' महर्षी जैमिनींच्या दर्शनशास्त्राचा प्रारंभच ‘अथा तो धर्म Hindu जिज्ञासा' या सूत्राने झाला आहे. त्यांनी वेदांनी ज्याची प्रेरणा दिली आहे, त्याला धर्म असे म्हणतात, असे म्हटले आहे. महर्षी जैमिनींनी धर्म Hindu, धर्मशास्त्र यांचे स्वरूप, उद्दिष्ट लक्षणे स्पष्ट केली आहेत. ‘चोदना'चा अर्थ आज्ञा, प्रेरणा, विधी, उपदेश यांनी ज्ञात होणारी वा घडणारी क्रिया असा होतो. या शब्दाचा धात्वर्थ ‘प्रेरणा' असा आहे. त्यानुसार त्यांनी ‘चोदना लक्षणोर्थः धर्मः' अशी धर्माची Hindu व्याख्या केली आहे. यातही वेदांचा संबंध आहेच. महर्षी जैमिनींनी केलेली व्याख्या आधुनिक काळातील सर्व धर्मांचेही Hindu स्वरूप स्पष्ट करणारी आहे. त्या संबंधात लक्ष्मणशास्त्री जोशी Lakshmanshastri Joshi  म्हणतात-‘‘जैमिनीची धर्म व्याख्या जगातील सर्व धर्मास नीटपणे लागू पडते. झरथष्ट्र, मोझेस, कन्फ्युशस, येशु ख्रिस्त किंवा महंमद पैगंबर यांना ईश्वरीसंकेत प्राप्त झाले. साक्षात्कार (रिव्हिलेशन) झाला आणि त्यांनी त्याप्रमाणे उपदेश केला, अशी त्या त्या धर्मानुयायांची श्रद्धा आहे. विश्वास आहे. हा दैवी उपदेश (डिव्हाईन इन्स्पिरेशन) म्हणजे ‘चोदना' होय. (धर्माचे स्वरूप कार्य , पृ.स. १०८)
 
मेधातिथिने धर्माची Hindu व्याप्ती-वर्णधर्म, आश्रमधर्म, वर्णाश्रमधर्म, नित्य धर्म, नैमित्तिक धर्म, विशेष धर्म, सामान्य धर्म या विविध प्रकारे सांगितली आहे. त्या त्या प्रसंगात त्याचे वेगवेगळेपण असले, तरीसुद्धा जीवन विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेला मूळ तात्त्विक भाव मात्र कायम असतो, हे आपल्या लक्षात येते. लौकिक भाषेत यालाच आपण धर्माधिष्ठित आचारसंहिता असे म्हणतो. मूल्याधिष्ठित जीवन व्यवहार (व्हॅल्युबेसड् लाईफ स्टाईल) असे म्हणतो. धर्मभूमी भारतात धर्म संकल्पनेचा विकास वेदकाळापासून अप्रतिहत गतीने होतच आला आहे. वेद, उपनिषदे, ब्राह्मण ग्रंथ, दर्शने, प्रस्थान त्रयीवरील विविध आचार्य, विद्वान पंडित यांनी केलेले भाष्य ग्रंथ, रामायण-महाभारतासारखी महाकाव्ये, पुराणे या साहित्यातून विविध घटना, प्रसंग, त्या काळात होणा-या विविध यज्ञांच्या निमित्ताने होणा-या प्रदीर्घ कालावधीच्या होणा-या विद्वत् परिषदा, त्यात अखंडपणे चालणारे विचार मंथन, या माध्यमातून व्यक्तिधर्म, समाजधर्मापासून तो राष्ट्रधर्म ते विश्वकुटुंब-वादापर्यंतचे सर्व विषयांच्या संदर्भात धर्म चर्चा होत असत व त्यामधूनच जीवन विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्व शास्त्र शाखांची आणि अतींद्रिय विज्ञानाची रचना झाली आहे.
 
पण ऋषिमुनींची, शास्त्रकारांचे महत्तता म्हणजे मोठेपणा आणि कुशलता ही आहे की, त्यांनी जाणीवपूर्वक प्रदीर्घ चिंतनातून, अनुभव सिद्धतेतून अशी आचारमूल्ये, जीवनमूल्ये, प्रस्थापित केलीत की, ज्यांच्या आचरणाने प्रत्येक मानवाचा पशुभावाकडून देवभावाकडे सहजपणे प्रवास व्हावा. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात त्याप्रमाणे ‘देहबुद्धीचे आत्मबुद्धीत' सहजपणे परिवर्तन व्हावे. त्या दृष्टीने शास्त्रकारांनी, स्मृतिकारांनी विविध प्रकारच्या गुणांंचे अवतरण मानव जीवनात व्हावे यासाठी प्रयत्न केलेत. त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न केला की, त्याचा स्वाभाविक परिणाम म्हणून जीवनात सुख, शांती, समृद्धता, समाधानाची निर्मिती होते आणि या गोष्टींनी युक्त असे जीवन कोणाला नको असते. त्यामुळे त्यांनी ‘धर्मंचर' अशी आज्ञा दिली. ते केवळ आज्ञा देऊनच थांबले नाहीत तर कसे वागायचे, याचे आचरणाचे सिद्धांतही त्यांनी विविध स्मृतिग्रंथांच्या द्वारा समाजात प्रसृत केले. स्मृतिग्रंथांमध्ये त्यांचा उल्लेख सापडतो. हिंदू जीवन पद्धतीत सर्व संदर्भात व जीवनाच्या सर्व अवस्थांमध्ये सामान्यपणे उपयोगी असणारे महत्त्वाचे गुण मनुस्मृतीत पुढीलप्रमाणे दिले आहेत. ते असे. त्यांनाच धर्माची लक्षणे म्हटले आहे.
धृतिः क्षमा दमोऽस्तेयं शौचमिन्द्रियनिग्रहः।
धी र्विद्या सत्यम्क्रोधो दशकं धर्मलक्षणम्।।६।९२।।
म्हणजे- ‘धैर्य, सहनशीलता, कामवृत्ती आणि लोभावर संयम, अचौर्य (चोरी न करणे) कायिक, वाचिक, मानसिक पावित्र्य, इन्द्रियांवर संयम, ज्ञान, अध्ययनशीलता, सत्याचे आचरण, क्रोधाचा अभाव हे दहा धर्माचे लक्षणे आहेत.
 
वरील महत्त्वाचे दहा लक्षणे सर्व जीवनव्यापी आहेत. यांनी अलंकृत असलेले जीवन हे ‘धार्मिक' जीवन म्हणता येईल. त्या प्रत्येक गुणाची, लक्षणाची माहिती अर्थात आशय पाहण्याचा प्रयत्न करू.
१. धृतिः म्हणजे धैर्य. भगवान श्रीकृष्णांनी या गुणाची गणना स्वतःच्या विभूतींमध्ये केली आहे. लौकिक जीवनात ज्याला आपण धैर्य म्हणजे निर्भयता म्हणून समजतो. त्यापेक्षा याचा अर्थ अधिक सूक्ष्म आहे. खोल आहे. श्रीमद् भागवतामध्ये याचे लक्षण स्पष्ट करताना असे म्हटले आहे की, ‘जिव्होपस्थजयो धृतिः' म्हणजे जीभ आणि जननेंद्रियावर ज्याचा संयम आहे, तो धीरपुरुष. याचा सरळ अर्थ म्हणजे ‘रसना आणि वासना' ज्याच्या ताब्यात आहेत तोच खरा धार्मिक पुरुष म्हणता येईल. श्रीगुरुचरित्रात Hindu ब्रह्मदेवाच्या दरबारात कलियुगाचा प्रवेश होतो त्यावेळी युगपुरुषाचे प्रतीक असलेला पुरुष एका हातात जीभ आणि एका हातात जननेंद्रिय धरून प्रवेश करतो. ब्रह्मदेव त्याला त्याचे कारण विचारतात. त्यावेळी तो युगपुरुष उत्तर देताना म्हणतो-
देखोनि तयाचे लक्षण। ब्रह्मा हंसे अतिगहन।
पुसतसे अति विनोदाने। लिंग जिव्हा कां धरिली।।२।८१।।
कलियुग म्हणे ब्रह्मयासी। जिंकिन समस्त लोकांसी।
लिंग जिव्हा रक्षणारांसी। हारी असे आपणाते।।८२।।
याचा अर्थ असा आहे की, ‘रसना आणि वासना' या दोन वृत्तींवर ताबा असणारा, संयम असलेला धैर्यवान पुरुषच कलियुगाचे सर्व विपरीत परिणाम सहन करू शकतो. म्हणजे त्याचा पराभव करू शकतो.
२. क्षमा- हा गुण जीवन जगताना अत्यावश्यक आहे. क्षमेतूनच सहिष्णुता निर्माण होते. सहिष्णुतेमुळेच इतरांसोबत जीवन जगणे शक्य होते. ‘क्षमा वीरस्य भूषणम् आहे. पण जीवन जगताना याचा विवेक ठेवणे आवश्यक असते. नाहीतर सोळा वेळा पराभूत केलेल्या घोरीसमोर पराभूत होण्याची नामुष्की पदरात पडते. याच क्षमाशील वृत्तीला सावरकरांनी ‘सद्गुण विकृती' असे म्हटले आहे.
३. दम- आपल्या कर्मेन्द्रियांवर, ज्ञानेंद्रियांवर संयम, ताबा असणे याला ‘दम' असे म्हणतात. इंद्रिये ही बहिर्मुखी असतात. इंद्रिये आणि त्यांचे विषय यांच्या संयोगाबाबतीत सावध राहणे जरूर आहे. नाही तर भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे ‘इंद्रियाणि प्रमाथिनी हरन्ति प्रसभं मनः' असा प्रकार घडतो. भारतीय तत्त्वज्ञानात Hindu जबरदस्तीने इंद्रियांचा संयम त्याज्य मानला आहे. त्यासाठीचे गीतेने ‘युक्त आहार विहारस्य'चा उपदेश केला आहे.
४. अस्तेय- अस्तेय याचा अर्थ चौर्य कर्म न करणे. आपल्या हक्काची नसलेली कोणतीही गोष्ट प्राप्त करण्याची इच्छा, अभिलाषा मनात उत्पन्न होणे याला चौर्यकर्म म्हटले आहे. उपनिषद काळापासून या संबंधात उपदेश देण्यात आला आहे की, ‘मा गृधःकस्यास्विद्धनम् म्हणजे कोणाच्याही द्रव्याची लालसा करू नका. अस्तेय हा गुण जर व्यक्ती-व्यक्तीत निर्माण झाला तर भ्रष्टाचाराला वावच राहत नाही तसेच या प्रामाणिकपणाने जीवन जगणा-या व्यक्तीला लौकिक जीवनात पूर्ण यश मिळून समृद्धता मिळते, हे पतंजली मुनींनी पुढील सूत्रात स्पष्ट केले आहे. ते म्हणतात- ‘जो मनुष्य अस्तेय धर्माला सिद्ध करतो त्याला सर्व प्रकारची रत्ने (समृद्धता) मिळतात. ‘अस्तेयप्रतिष्ठायां सर्व रत्नोपस्थानम् ऑनेस्टी क्रिएट्स प्रॉस्पेरिटी' असा एक इंग्रजी वाक्प्रचार आहे.
५. शुचिता- पवित्रता- शुचिता म्हणजे स्वच्छता. स्वच्छता दोन प्रकारची असते. एक बाह्यस्वरूपी, दुसरी आंतरिक मनाची. आपल्या जीवनधारणेत आंतरिक शुचितेला अधिक महत्त्व दिले आहे. महागडे कॉस्मॅस्टिक्स, स्प्रे, सुगंधी साबण याने कदाचित देहाची शुद्धी होईल. पण मनाची? शरीराबरोबर मन, बुद्धी, चित्त यांची शुद्धी होणे महत्त्वाचे. कारण त्यांच्या आदेशाने, प्रेरणेनेच इंद्रियांचे व्यवहार होतात. मनुस्मृतीमध्ये म्हटले आहे-
अद्भीर्गात्राणि शुद्धयन्ति मनःसत्येन शुद्धयति।
विद्यातपोभ्यां भूतात्मा बुद्धिज्र्ञानेन शुद्धति'' म्हणजे जलाने देहाची, सत्यवचनाने मनाची, ब्रह्मज्ञानाने जीवात्म्याची, ज्ञानाने बुद्धीची शुद्धता होते. शुद्ध बुद्धी ही सर्व उपासना साधनेचे प्रमुख साधन आहे.
६. इंद्रिय निग्रह- धर्म साधनेचे सर्वात महत्त्वाचे अंग जर कोणते असेल तर ते म्हणजे इंद्रिय निग्रह, आत्मसंयम. गीता, सर्व संतांचे ग्रंथ यात याचे अचूक, सखोल आणि सर्वस्पर्शी विश्लेषण आणि मार्गदर्शन आहे.
 ७. विद्या- विद्या या धर्मलक्षणाची निरुक्त ग्रंथात केलेली व्याख्या अशी आहे. ‘ज्यांच्यामुळे चतुरमनुष्य धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारही पुरुषार्थांचे यथार्थ ज्ञान प्राप्त करू शकतो, त्याच ख-या अर्थी विद्या आहेत. याच अर्थाने भगवान श्रीरामकृष्ण म्हणायचे, ‘मला पोट भरण्याची विद्या नको तर परमेश्वरप्राप्तीची विद्या हवी' अशा विद्यांच्या संबंधातच ‘नास्ति विद्यासमं चक्षुः' असे म्हणण्यात येते.
 
८. सत्य- हे लक्षण धर्माचा गाभाच आहे. रामायणात ‘आहुः सत्यं हि परमं धर्मं धर्मविदो जनः' म्हणजे धर्मनिष्ठ Hindu लोक सत्यालाच परमधर्म मानतात. सर्वभूतांचे कल्याण करणारा, इंद्रियजयी, सहिष्णुता, दान, ध्यान हे सर्व सत्याची आचरण संहिताच आहे.
९. अक्रोध- काम, क्रोध हे धर्माची अनुभूती घेण्याच्या मार्गातील फार मोठे अडथळे आहेत. ते रजोगुण समुद्भवः आहेत. धर्ममार्गातील शत्रू आहे आणि शत्रूंपासून अखंड सावध राहणे नित्य गरजेचेच असते.
१०. धी- म्हणजे बुद्धि, घृति. म्हणजे धैर्य, श्रीमद् भागवतात ‘जिव्होपस्थजयोधृतिः' असे म्हटले आहे. ‘रसना' आणि ‘वासना' यांचा संयम म्हणजे धृतिः !
वरील प्रमुख, सर्वस्पर्शी असलेल्या धर्मलक्षणांचे Hindu आचरण, चिंतन जर आपल्याकडून झाले तर व्यक्तिगत जीवन, सामाजिक जीवन, राष्ट्रीय जीवनापर्यंत दृढमूल झालेल्या अनेक कलहप्रसू, तामसी, विकृती सहजपणे नष्ट होऊन सामंजस्याचे, एकात्मभावाचे वातावरण सहज उत्पन्न होऊ शकेल. तीच या धर्मलक्षणांची Hindu ‘फलश्रुति' असेल. त्यासाठी अगदी सोपा उपाय म्हणजे- ‘‘आत्मनः प्रतिकूलानि परेषां न समाचरेत' ‘डु अन टु अदर्स, अ‍ॅज यु वुड ह्याव देम् डु अन टु यु.' (बायबल) Bible 
-डोरले