मागील वर्षभरात जंगलांमध्ये वणव्यांच्या 3.98 लाख घटना

    दिनांक :14-Jan-2022
|
नवी दिल्ली,
मागील वर्षभरात देशातील जंगलांमध्ये वणवा deforestation लागण्याच्या 3.98 लाखांहून घटना घडल्या असून, त्यापूर्वीच्या वर्षाच्या तुलनेत या दुपटीहून अधिक आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी जाहीर केलेल्या इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट (आयएसएफआर) 2021 मध्ये ही बाब नमूद करण्यात आली आहे.
 
nationaa
 
नोव्हेंबर 2020 ते जून 2021 या कालावधीत देशभरातील जंगलांमध्ये वणवा deforestation लागल्याच्या एकूण 3,98,774 घटना घडल्या आहेत. त्यापूर्वी 2019-20 मध्ये समान कालावधीत 1,46,920 वणव्याच्या घटना दिसून आल्या. ओडिशात सर्वाधिक 51,968, त्यानंतर मध्यप्रदेशात 47,795 आणि छत्तीसगडमध्ये 38,106 वणवे लागले होते. जिल्हास्तरावर सर्वाधिक 10,577 वणवे महाराष्ट्रातील गडचिरोलीमध्ये नोंदवण्यात आल्या. यानंतर ओडिशातील कंधमालमध्ये 6,156 आणि छत्तीसगढमधील बिजापूर जिल्ह्यात 5,499 वणवे लागले होते.