आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये सहा एअरबॅग्ज अनिवार्य : गडकरी

    दिनांक :14-Jan-2022
|
नवी दिल्ली, 
Airbags : चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करणार्‍यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये सहा एअरबॅग्ज अनिवार्य करण्याची घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज शुक्रवारी केली. एअरबॅग्ज अनिवार्य करण्याला मंजुरी मिळाल्याचे गडकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले आहे. आपल्या ट्विटमध्ये गडकरी म्हणाले की, आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करणार्‍यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आता या चारचाकी वाहनांमध्ये किमान सहा एअरबॅग्ज अनिवार्य करण्यात आल्या आहेत. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने याआधीच 1 जुलै 2019 पासून चालक एअरबॅग्ज Airbags आणि 1 जानेवारी 2022 पासून चालकासमोरील सह-प्रवासी एअरबॅग्जच्या फिटिंगची अंमलबजावणी अनिवार्य केली होती.
 

gadakari 3 
 
चारचाकी वाहन्यांमध्ये पुढील आणि मागील दोन्ही कंपार्टमेंटमध्ये बसलेल्या प्रवाशांना अपघाताचा प्रभाव कमी करण्यासाठी, एम-1 वाहन श्रेणी म्हणजेच आठ आसनी वाहनात 4 अतिरिक्त एअरबॅग्ज Airbags अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतातील वाहनांना पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. एअरबॅग्ज नियमांमुळे प्रवाशांची सुरक्षितता अधिक चांगली होईल, असेही गडकरी यांनी सांगितले.
किंमत 3000 ते 4000 रुपयांपर्यंत वाढेल
एअरबॅग्जची संख्या वाढली तर, कारमधील अतिरिक्त एअरबॅग्जमुळे Airbags कारची किंमत प्रती एअरबॅग तीन ते चार हजार रुपयांनी वाढेल. मात्र, अपघात झाल्यास देशातील गरिबांनाही संरक्षण मिळाले पाहिजे. एका अहवालानुसार, मागच्या सीटवरील प्रवाशांसाठी चार एअरबॅग्स लावल्या तर किंमत फक्त आठ ते नऊ हजारांनी वाढेल. एअर बॅग्जची Airbags किंमत 1800 रुपये आहे आणि त्याचे आधुनिकीकरण करण्यासाठी 500 रुपयांचा खर्च येईल. यात मजुरी आणि महागाई दराचाही आहे. दुसरीकडे, कंपनी उत्पादकांच्या मते एअरबॅग्ज दिल्यास गाड्यांची किंमत 30 हजारांनी वाढेल.