सुझानबाबत अर्सनाल गोनीचे मोठे विधान...

    दिनांक :14-Jan-2022
|
मुंबई,
Suzan अभिनेता अर्सनाल गोनी गेल्या काही दिवसांपासून अभिनेता हृतिक रोशनची पहिली पत्नी सुझान खानला डेट करत आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. पण दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. पण दरम्यान अर्सनालने सुझानसोबत असलेल्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला. ज्यामुळे त्यांच्या नात्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.एका मुलाखती दरम्यान अर्सनालला सुझानसोबत असलेल्या नात्याबद्दल विचारण्यात आलं. यावर तो म्हणाला, 'मला सहसा याबद्दल बोलायला आवडत नाही. मी माझ्या मित्रांकडूनही त्याच गोष्टी ऐकत राहतो.
 

suj
Suzan तो पुढे म्हणाला, 'दोन व्यक्ती त्यांचे जीवन आनंदाने जगत आहेत याशिवाय काहीही नाही.' दरम्यान सुझानने कोविड चाचणी पॉझिटिव आल्याची पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. तेव्हा अर्सनालने तिच्या प्रकृतीबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून चिंता व्यक्त केली. सुझानच्या पोस्टवर तो म्हणाला, 'तु लवकरचं ठिक होशील... ' शिवाय त्याने बदाम आणि किस इमोजी देखील पाठवला. ज्यावरून अर्सनाल रिलेशनशिपमध्ये आहेत असा अंदाज व्यक्त करण्यात आला.