ताडोबाच्या धर्तीवर गोंदियातही बर्ड डायव्हर्स

सारस पक्ष्यांच्या संवर्धानासाठी पाऊल

    दिनांक :14-Jan-2022
|
तभा वृत्तसेवा
गोंदिया, 
जिल्ह्यात सरास पक्ष्यांची घटती संख्या आणि विविध कारणाने त्यांचा होणारा मृत्यू पर्याव्रणासाठी धोक्याची घंटा आहे. सातत्याने सारसांचा होणार्‍या मृत्यूसाठी उच्च न्यायालयाने प्रशासनाला चांगलीच फटाकर लावली आहे. यानंतर आता प्रशासनाने सारसांच्या संवर्धानासाठी पुढकार घेतला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक सारस पक्ष्यांचा मृत्यू हा विद्युत तारांचा स्पर्शाने झाल्याची बाब पुढे आली. त्यामुळे आता सारस पक्ष्यांचे संवर्धन करण्यासाठी त्यांच्या कॉरिडॉरच्या मार्गातील कंडक्टर्सवर पक्ष्यांना दूर ठेवण्यासाठीचे चंदपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याध्र प्रकल्पाच्या धर्तीवर बर्ड डायव्हर्स बसविण्यात येणार आहे. टॉवर्सवर पक्षी बसू नयेत, यासाठी पर्च रिजेक्टर्स सुद्धा लावण्यात येणार आहे.
 
 
ghkj
 
सारस संवर्धनासाठीच्या उपायायोजनांकडे शासन आणि प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षितपणाची उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दखल घेत स्वत:हून जनहित याचिका दाखल करुन घेतली. प्रशासनाला फटाकारीत महिनाभरात सारस संवर्धनाचा एक्शन प्लन तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर आता जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर सक्रीय झाले आहे. सारस नामशेष होण्यामागील कारणांचा शोध घेतला जात असून, यासाठी मागील 18 वर्षांपासून यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असलेल्या गोंदिया येथील सेवा संस्थेची मदत घेतली जात आहे.
 
 
सारस पक्ष्यांचा सर्वाधिक मृत्यू हा विद्युत तारांच्या स्पर्शाने झाला आहे. हीच बाब आता गांर्भीयाने घेत सारस पक्ष्यांच्या कॉरिडॉरच्या परिसरात बर्ड डायव्हर्स, विद्युत तारांचे इन्सुलेशन, अंडरग्राउंड विद्युतीकरण आदी उपाययोजना करण्याचे सुचविण्यात आले. विशेष मध्य प्रदेश सरकारने सुद्धा सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी अशा उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे बर्ड डायव्हर्स आता विविध उपाययोजनांची येत्या महिन्याभरात अंमलबजावणी केली जाणार आहे. सारसाचे संवर्धन आणि जनजागृतिसाठी चित्ररथ तयार करण्यात आले आहे. या रथाच्या माध्यमातुन जिल्ह्यात जनजागृतिला जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत 13 जानेवारीला सुरवात करण्यात आली.