दावोस आर्थिक परिषद सोमवारपासून

    दिनांक :14-Jan-2022
|
- पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधन
 
नवी दिल्ली, 
Davos Council : जगभरातील देशांसाठी आणि उद्योगपतींसाठी महत्त्वाची असलेल्या जागतिक आर्थिक फोरमच्या दावोस परिषदेचे Davos Council यावर्षी आभासी माध्यमातून आयोजन करण्यात येणार आहे. ही परिषद 17 जानेवारीपासून सुरू होणार असून, पाच दिवस चालणार आहे. या परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत.
 
 
modi 3345
 
पंतप्रधान मोदी या परिषदेला Davos Council आभासी माध्यमातून हजेरी लावणार असून, ते 17 जानेवारीला सायंकाळी चार ते साडे चारच्या सुमारास संबोधन करणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या व्यतिरिक्त या परिषदेला जगभरातील इतर नेते उपस्थिती लावणार आहेत. या वर्षीच्या परिषदेचा विषय हा ‘जागतिक परिस्थिती’ असा आहे. जगभरात कोरोनाची स्थिती लक्षात घेता यावर्षी प्रत्यक्ष परिषदेचे आयोजन रद्द करण्यात येत असून, ते आभासी पद्धतीने आयोजित करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली. भारतासाठी ही परिषद अत्यंत महत्त्वाची आहे.
काय आहे दावोस परिषद?
दावोस Davos Council हे स्वित्झर्लंडमधील लॅण्ड वासर नदीच्या काठावर वसलेले सुंदर गाव आहे. दावोसमध्ये दरवर्षी जागतिक आर्थिक फोरमच्या माध्यमातून एक बैठक आयोजित करण्यात येते. या बैठकीसाठी जगभरातील बडे नेते आणि उद्योगपती उपस्थिती लावतात. या फोरमची स्थापना 1971 मध्ये करण्यात आली होती. या संस्थेचे मु‘यालय स्वित्झर्लंडची राजधानी जिनेव्हामध्ये आहे.