घरगुती वापराचा गॅस ऑटोमध्ये रिफिलींगचा भांडाफोड

    दिनांक :14-Jan-2022
|
तभा वृत्तसेवा
अमरावती,
गुन्हे शाखा पोलिसांच्या गस्तीवर असलेल्या पथकाने घरगुती गॅस रिफिलींगचा भांडाफोड केला आहे. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली.
 
gas refilling
 
सर्वोदय कॉलनीत हा गोरखधंद्दा सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारावर छापा टाकण्यात आला. त्यावेळी घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधला गॅस अवैधरित्या अ‍ॅटोमध्ये मशिनद्वारे रिफिलिंग करून भरण्यात येत असल्याचे पोलिसांना दिसले. गॅस सिलेंडरची काळाबाजारी करुन तुटवडा निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याने पोलिसांनी पंकज रामदास तायडे (वय 43 वर्ष, रा. सर्वोदय कॉलनी) याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातुन भारत गॅस कंपनीचे घरगुती वापराचे 8 गॅस सिलेंडर, एक निनावी कंपनीची गॅस रिफिलिंगची मोटार, रेग्युलेटर असा एकुण 32 हजार 400 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हा दाखल करण्यात आला असून फ्रेजरपुरा पोलिस पुढील कारवाई करणार आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक नरेशकुमार मुंढे,राजुआप्पा बाहेणकर, फिरोज खान, अजय मिश्रा, सतीश देशमुख, चालक लुटे यांनी केली.