जाहीर सभांवरील बंदी 15 जानेवारीनंतरही कायम

    दिनांक :14-Jan-2022
|
-देशभरातील कोरोना स्थितीचा आढाव्यानंतर निर्णय
 
नवी दिल्ली, 
Public meeting : देशात कोरोना संसर्गाची सध्याची परिस्थिती पाहता निवडणूक आयोग 15 जानेवारीनंतरही जाहीर सभा Public meeting आणि प्रचारसभांवरील बंदी कायम ठेवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निवडणूक आयोगाने कोरोना महामारीच्या पृष्ठभूमीवर उत्तरप्रदेश, पंजाब, मणिपूर, गोवा आणि उत्तराखंड या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये काही निर्बंध लागू केले आहेत. मतदानाचा कालावधी एक तासाने वाढण्याचा निर्णय घेतला असून, प्रचारकाळात सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक केले आहे.
 
 
Election Commission
 
याशिवाय 15 जानेवारीपर्यंत Public meeting रॅली, प्रचारसभा, सार्वजनिक बैठका, रोड शो, सायकल वा दुचाकी रॅलीवर बंदी घातली आहे. यानंतर कोरोना परिस्थितीचा आढावा घेत निर्णय घेतला जाईल, असे म्हटले होते. मात्र, सध्या देशातील कोरोना संसर्गाची एकूण स्थिती पाहता आयोगाकडून या संदर्भात निर्णय येण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने 8 जानेवारीला घोषित केलेल्या एकूण कार्यक्रमात राजकीय पक्ष आणि उमेदवारांना घरोघरी प्रचार करण्याची परवानगी दिली आहे. समाजमाध्यमाद्वारेही उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. परंतु, उत्तरप्रदेशसारख्या राज्यात अशा प्रकारचा आभासी प्रचार कसा करायचा, यावर काही राजकीय पक्षांनी चिंता व्यक्त केली आहे.